ठाकरे बंधूची ही युती मराठी मतदारांची मोट बांधून भाजपला कडवं आव्हानं निर्माण करणार अशी चर्चा सुरू झाली आणि कुठलाही धोका पत्करायचा नाही या भूमिकेतून भाजपनं जागावाटपाच्या चर्चेत नवी रणनीती आखली...
भाजप-शिंदेसेनेत जागावाटपावरून रस्सीखेच
बीएमसीसाठी शिवसेनेकडून 100 जागांची भाजपकडे मागणी
भाजपकडून शिंदेसेनेला 100 ऐवजी 70 जागांचा नवा प्रस्ताव
पहिल्या चर्चेत 52 जागा देण्याची भाजपची तयारी
भाजप-शिंदेसेनेत अद्याप 25-30 जागांचा तिढा कायम
मित्रपक्षाला ताकद देऊन 'मराठी कार्ड' खेळण्याची भाजपची रणनीती
दरम्यान भाजप मुंबईवर पूर्ण वर्चस्व मिळवण्याच्या तयारीत आहे.. त्यामुळे ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी ठाकरेंच्या मराठी व्होट बँकसमोर तगडं आव्हान निर्माण करणं आवश्यक आहे... त्यामुळे मित्रपक्षाला जागावाटपात जास्त जागा देऊन भाजप ठाकरेंना बालेकिल्ल्यातच रोखण्याचा मास्टरप्लॅन आखतेय...
दरम्यान शिंदेसेना 100 जागांवर ठाम असून दोन्ही पक्षांमधील रस्सीखेच कायम आहेत. अशातच ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी व्होट बँकला धक्का लागू नये, यासाठी भाजपनं 70 जागा शिंदेसेनेला देण्याची तयारी दर्शवलीय. त्यामुळे ठाकरेंची युती शिंदेसेनेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.