Danushka Gunathilaka Sri lanka Rape Case Arrest Saam Tv
Sports

Cricket News : श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजावर बलात्काराचा आरोप; पोलिसांनी केली अटक, क्रिडा विश्वात खळबळ

टी २० विश्वचषक स्पर्धा ऐन रंगतदार स्थितीत असताना क्रिडा विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे.

Satish Daud

Cricket News : टी २० विश्वचषक स्पर्धा ऐन रंगतदार स्थितीत असताना क्रिडा विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. श्रीलंका टीमचा विस्फोटक फलंदाज धनुष्का गुनातिलका याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. धनुष्काला ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथून अटक करण्यात आली आहे. रविवारी श्रीलंकेचा संघ धनुष्का शिवाय मायदेशी परतला आहे. (Cricket News)

श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज म्हणून ओळखला जाणारा धनुष्का गुनातिलका याच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका २९ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून सिडनी पोलिसांनी धनुष्काला ताब्यात घेतलं आहे.

महिलेने आरोप केला आहे की, गुणथिलकाने घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अशी माहिती पोलिसांनी दिली. ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, पोलिसांनी आरोप केला आहे की या महिलेने ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे अनेक दिवस दनुष्का गुनाथिलकाशी चॅट केले होते.

बुधवारी दोघांची भेट झाली होती. त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजाने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. श्रीलंकेच्या टीमने शनिवारी इंग्लंडविरोधात वर्ल्डकपमधील अखेरचा सामना खेळला होता.

या मॅचनंतर काही वेळातच पोलिसांनी धनुष्काला अटक केली. त्याच्या अटकेची बातमी कळताच, क्रिडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. श्रीलंकेचे अन्य खेळाडू त्याच्याशिवायच श्रीलंकेला रवाना झाले असल्याचे माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

Gen-Z Podcast Bulletin : टीव्ही विश्वातील पहिलं Gen Z बुलेटिन फक्त साम टीव्हीवर; कधी आणि कुठे-कुठे बघायला मिळणार? वाचा

वनरक्षकालाच वाघानं उचलून नेलं? हल्ला करतानाचा वाघाचा व्हिडिओ?

Mumbai Voter List: मुंबईत मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ; ३५० हून अधिक मतदारांना पत्ताच नाही, मनसेकडून आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT