Finn Allen celebrates his record-breaking century during the T20 World Cup semi-final against South Africa at Eden Gardens, Kolkata. saam tv
Sports

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

T20 WC 2026 Semi Final : २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. फिन अॅलनच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना ९ विकेट्सने जिंकला.

Bharat Jadhav

फिन ॲलनची विक्रमी सेंच्युरी आणि टिम सिफर्टच्या कडक अर्धशतकाच्या जोरावर गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी धूळ चारत न्यूझीलंडने दिमाखात फायनलमध्ये धडक मारली. कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर या दोन्ही संघात सामना झाला. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ अपराजित राहत सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ ‘जर-तर’च्या समीकरणात अडकला होता, पण सेमी फायनलच्या सामन्यात मात्र त्यांनी कमाल करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं.

रनरेटच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली होती. याच स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच वेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूझीलंडने यावेळी हिशेब चुकता करत दणदणीत विजय मिळवला. आता न्यूझीलंडचा संघ दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपची फायनल खेळताना दिसणार आहे.

टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने पराभव करत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. फिन अॅलनने अवघ्या ३३ चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. तो टी२० विश्वचषक इतिहासात सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे तो नाबाद राहिलाय. या बाबतीत त्याने ख्रिस गेललाही मागे टाकले. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १६९ धावा केल्या होत्या. हे आव्हान न्यूझीलंडने १२.५ षटकांत फक्त एका गडी गमावत सहज पार केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT