harpreet brar twitter
Sports

SMAT 2024: 4 चेंडू 24 धावांची गरज, पंजाबच्या फलंदाजाने 4,6,6,6..खेचत सामना केला टाय; सुपर ओव्हरमध्ये लागला निकाल

Punjab vs Mizoram, Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत पंजाब आणि मिझोरम या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

Harpreet Brar News In Marathi: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत इतका रोमांचक सामना पाहायला मिळेल असा विचार कोणीच केला नसेल. पंजाब आणि मिझोरम यांच्यात झालेल्या सामन्यााचा अनेपक्षित शेवट झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात मिझोरमने फलंदाजी करताना २० षटकअखेर १७६ धावा केल्या. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी १७७ धावा करायच्या होत्या.

पंजाब संघात एकापेक्षा एक ताबडतोड फलंदाज आहेत. कर्णधार अभिषेक शर्मा, नेहाल वढेरा, प्रभसिमरसिंग, नमन धीर आणि रमनदीप सिंगसारखे फलंदाज संघात असताना, पंजाबचा संघ हा सामना सहज जिंकेल, असं वाटलं होतं.

मात्र असं काहीच झालं नाही. धावांचा पाठलाग करताना नमन धीरने शानदार खेळी करत २४ चेंडूत ४१ धावांची वादळी खेळी केली. मात्र या दोघांना वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

हा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. शेवटच्या ४ चेंडूंवर पंजाबला विजयासाठी २४ धावांची गरज होती. त्यावेळी पंजाबकडून हरप्रीत बरार स्ट्राईकवर होता. त्याने एक चौकार आणि ३ षटकार खेचले.

यासह एक अतिरिक्त धाव मिळाल्याने सामना बरोबरीत समाप्त झाला. पंजाबचा संघ हा गेल्या हंगामातील चॅम्पियन संघ आहे. या संघावर मिझोरमकडून पराभवाचं संकट होतं. मात्र हरप्रीत बरारच्या शानदार फटकेबाजीमुळे हा पराभव टळला.

हा सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना पंजाबने १४ धावा करत हा सामना जिंकला. पंजाबसारख्या बलाढ्य संघासमोर खेळताना, मिझोरमच्या फलंदाजांनीही शानदार फलंदाजी केली.

मिझोरमकडून अग्नी चोपडाने ५२ धावांची खेळी केली. तर मोहीत जंगराने ३४ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. हरप्रीत बरारला पंजाब किंग्जने १.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT