pv sindhu & malvika bansod saam tv
Sports

Syed Modi Badminton: नागपूरची मालविका बनसाेड पीव्ही सिंधूशी आज भिडणार अंतिम सामन्यात

आज दुपारी हाेणार अंतिम लढत

साम न्यूज नेटवर्क

लखनौ : लखनौ येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन (Syed Modi Badminton) स्पर्धेत आज महिला एकेरीचा अंतिम सामना अव्वल मानांकित पीव्ही सिंधू आणि नवाेदित बॅडमिंटनपटू मालविका बनसाेड यांच्यात हाेईल. नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन (badminton) स्पर्धेत मालविकाने साईना नेहवालचा (saina nehwal) पराभव करुन काैतुकाची थाप मिळविली हाेती. आजचा सामना देखील रंगतदार हाेईल. मालविका (malvika bansod) सिंधूला (PV Sindhu) उत्तम टक्कर देईल अशी आशा महाराष्ट्रातील क्रीडा रसिकांना आहे.

या स्पर्धेतील अंतिम सामन्यांना आज दुपारी दाेन वाजता प्रारंभ हाेणार आहे. मालविकाने अनुपमा उपाध्याय हिचा 19-21, 21-19 21-7 असा चुरशीच्या लढतीत पराभव करुन अंतिम फेरी गाठली.

शनिवारी उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूची रशियन प्रतिस्पर्धी एव्हगेनिया कोसेत्स्काया दुखापतग्रस्त झाली. त्यामुळे तिने सामना साेडला. अव्वल मानांकित सिंधूने पहिला सेट 21-11 असा सहज जिंकला हाेता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Sunbai Yojana: लाडकी बहीणनंतर लाडकी सुनबाई योजना! उपमुख्यमंत्र्यांनी केला शुभारंभ; नक्की आहे तरी काय?

Maharashtra Live News Update: बुलढाण्याला मिळणार गोड पाणी ; दिवाळी होणार गोड

भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाचा कहर, मुंबईसह राज्यात कोसळधारा, वाचा आज कोणत्या भागात IMD चा कोणता अलर्ट

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार! केंद्र सरकार मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT