swapnil kusale saam tv
क्रीडा

Swapnil Kusale: पोरानं नाव काढलं! स्वप्नीलचं यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू - VIDEO

Swapnil Kusale Parents Reaction: कोल्हापुरच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिसमध्ये ५० मीटर रायफल ३ पोझिशन शुटींग प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिंपिक २०२४ स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी सुरु आहे. स्पर्धेतील सहाव्या दिवसाच्या सुरुवातीलाच पॅरिसमधून आनंदाची बातमी समोर आली आहे. कोल्हापुरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळेने (Swapnil Kusale) ५० मीटर रायफल ३ पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे. हे या स्पर्धेतील भारताचं तिसरं पदक ठरलं आहे. दरम्यान मुलाने पॅरिसमध्ये तिरंगा फडकवल्यानंतर स्वप्नीलचे वडील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Swapnil Kusale paris olympics)

'गेली १४-१५ वर्षे आम्ही त्याच्यासाठी जे केलंय ते शब्दात सांगू शतक नाही. यामागेत त्यानेही प्रचंड कष्ट घेतलं आहे. त्याचं कष्ट फार मोठं आहे.' असं स्वप्नीलचे वडील म्हणाले.

स्वप्नीलच्या यशाचं श्रेय त्यांनी दीपाली देशपांडे यांना दिलं. दीपाली देशपांडे या स्वप्नीलच्या प्रशिक्षक आहेत. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ' स्वप्नीलच्या यशा त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचा मोलाचा वाटा आहे. गुरुपोर्णिपेच्या दिवशी त्याने बोलून दाखवलं होतं की,दीपाली देशपांडे या फक्त माझ्या प्रशिक्षक नाही, तर त्या आईसारखी माझी काळजी घेत आहेत. यासह संपूर्ण देशवासीयांचं प्रेम आणि शुभेच्छांमुळे हे शक्य झालंय, असं त्याचे वडील म्हणाले.

नेमबाजीत भारताला तिसरं पदक

आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारताने शूटिंगमध्ये ३ पदकं पटकावली आहेत. नेमबाज मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधला. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी मिळून कांस्यपदक पटकावलं.

हे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताने शूटिंगमध्ये मिळवलेलं दुसरं पदक ठरलं होतं. आता स्वप्नील कुसळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन शूटिंग प्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: धारावीतून ज्योती गायकडवाड आघाडीवर

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT