sarfaraz khan saam tv news
Sports

Sarfaraz Khan: 'जल्लोषाची तयारी करा..' सरफराजची टीम इंडियात निवड होताच सूर्यकुमार यादवची खास पोस्ट

Suryakumar Yadav Instagram Story: सरफराज खानची भारतीय संघात निवड झाली आहे. दरम्यान संघात निवड होताच सूर्यकुमार यादवने खास पोस्ट शेअर केली आहे.

Ankush Dhavre

Suryakumar Yadav Instagram Story For Sarfaraz Khan:

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनममध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यातून केएल राहुल आणि रविंद्र जडेजा बाहेर झाला आहे.

त्यांच्याऐवजी वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार आणि सरफराज खानला संधी दिली गेली आहे. दरम्यान सरफराज खानची निवड होताच भारताचा स्टार क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने एक खास पोस्ट शेअर करत त्याचं अभिनंदन केलं आहे. (Suryakumar Yadav Instagram Story)

गेल्या काही वर्षांपासून रणजी ट्रॉफी स्पर्धेत सरफराज खानचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्याने धावांचा पाऊस पाडत सिलेक्टर्सचं लक्ष वेधून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र त्याला संधी दिली जात नव्हती. अखेर त्याची कसोटी संघात निवड झाली आहे. दरम्यान निवड होताच सूर्यकुमार यादवला प्रचंड आनंद झाला आहे. त्याने स्टोरी शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्याची इंस्टाग्राम स्टोरी सध्या तुफान चर्चेत आहे. (Latest sports updates)

सूर्यकुमार यादवने स्टोरी शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे. त्याने सरफराज खानसोबतचा (Sarfaraz Khan) फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून ' मला खूप आनंद झाला आहे. भारतीय संघात निवड झालीये.. जल्लोष साजरा करायची तयारी करा.. '

रणजी क्रिकेटमध्ये दमदार खेळ...

सरफराज खानने गेल्या ४ वर्षात दमदार खेळ करून दाखवला आहे. त्याने २०२२-२३ हंगामातील ६ सामन्यांमध्ये ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत. तर २०२१-२२ च्या रणजी हंगामात त्याने १२२.७५ च्या सरासरीने धावा केल्या.

यापूर्वी २९१९-२० मध्ये झालेल्या हंगामात त्याने १५४.६६ च्या सरासरीने धावा केल्या होत्या. त्याची ही दमदार कामगिरी पाहता त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर त्याला संधी मिळाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (कर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वाशिंगटन सुंदर आणि सौरभ कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT