Suryakumar Yadav  
Sports

IND VS SL: कर्णधार सूर्यकुमारने पहिल्याच सामन्यात झळकावले झंझावाती अर्धशतक, गंभीर सरही खूश

Suryakumar Yadav : टीम इंडियाचा नवा टी २० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी २० मध्ये शानदार फलंदाजी करत अर्धशतक केलं. सूर्याच्या कर्णधारपदाच्या खेळीनंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

Bharat Jadhav

टी-२० क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीला लगाम लावणं अशक्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. पल्लेकलेतील श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी- २० सामन्यात सूर्यकुमारने तुफान फटकेबाजी करत आपण किती उच्च कोटीचे फलंदाज आहोत हे त्याने सिद्ध केलंय. दरम्यान पल्लेकलेमधील स्टेडियमवर झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाचा ४३ धावांनी पराभव केला.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमारने दमदार खेळ दाखवला. कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या टी२० सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले. सूर्यकुमाने २२३ च्या स्ट्राईक रेटने २६चेंडूत ५८ धावा केल्या. सूर्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि २ षटकार मारले. सूर्याची ही खेळी खास आहे कारण तो प्रथमच टी-२० क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरला होता.य कर्णधारपदाचा भार असला तरी त्याने फलंदाजीत कोणताही बदल होणार नाही हे सिद्ध केले. सूर्यकुमार यादव पॉवरप्लेनंतर मैदानात उतरला होता, त्यामुळे त्याची खेळी खास ठरली.

गिल आऊट झाल्यानंतर सूर्या मैदानावर आला पण तो येताच जयस्वालही बाद झाला. लागोपाठ दोन चेंडूत दोन विकेट पडल्यानंतर टीम इंडियाची वेगवान सुरुवात कायम ठेवण्याचे आव्हान सूर्यकुमारसमोर होते. विशेष म्हणजे तो या कामगिरीत खरा उतरला. सूर्याने पंतसोबत ४३ चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली, यात पंतचे योगदान केवळ १६ धावांचे होते. पंतनेही या धावाही १७ चेंडूत केल्या होत्या. मात्र सूर्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने संघाची धावसंख्या थांबू दिली नाही.

सूर्यकुमार यादवने अवघ्या २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने बॅट उंचावत सर्वांचे आभार मानले. त्यावेळी नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने देखील त्याचं अभिनंदन केलं. यावेळी प्रशिक्षक गंभीरची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. गंभीर आपल्या जागेवरून उभा राहिला आणि उत्साहाने टाळ्या वाजवल्या. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहण्यासारखे होते. जेव्हा गौतम गंभीरने सूर्याची टी-२० कर्णधार म्हणून निवड केली तेव्हा लोक या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत होते, मात्र आता त्याचा निर्णय पहिल्याच सामन्यात योग्य असल्याचे दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT