Suryakumar yadav  saam tv
Sports

Suryakumar Yadav: यंदा 'सूर्या' तळपला, टी20 क्रिकेट मध्ये 1000 धावांचा झंझावात, सूर्यकुमारनं इतिहास रचला

सूर्यकुमार यादवने आज पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजीचा जलवा दाखवला.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघात 360 डिग्री प्लेयर म्हणून छाप टाकलेल्या सूर्यकुमार यादवने आज पुन्हा एकदा धडाकेबाज फलंदाजीचा जलवा दाखवला. भारतानं झिम्बाब्वे विरुद्धच्या आजच्या सामन्यात वीस षटकात 186 धावा ठोकल्या. पण या विशाल धावांचा डोंगर रचण्यात सुर्यकूमार यादवचा सिंहाचा वाटा होता.

अवघ्या 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी करून (Suryakumar Yadav) सुर्यकूमारने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये तीन अर्धशतक ठोकून सूर्यकुमारनं यंदाच्या टी20 क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये एका वर्षात 1000 धावा करणार सूर्यकुमार यादव भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. (Suryakumar yadav scored one thousand runs in calendar year for T20 cricket)

सूर्यकुमार यादवचा क्रिकेटच्या मैदानात झंझावात, इतिहास रचला

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं मैदानात चौफेर फटकेबाजी करून टी20 क्रिकेट मध्ये इतिहास रचला. मैदानात सर्वच दिशेला आक्रमक फटके मारून सूर्यकुमार धावांचा डोंगर रचतो. अप्रतिम फूटवर्कने भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडायला लावणारा सूर्यकुमार यादव आसीसी रॅंकिगमध्येही चमकला आहे.

टी20 क्रिकेटच्या जागतिक स्तरावर सूर्यकुमार यादव एका वर्षात एक हजार धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. पाकिस्तानचा सलमीवीर फंलदाज मोहम्मद रिझवानने 2021 साली जागतिक स्तरावर एका वर्षात हजार धावा करण्याचा करिष्मा केला होता. त्यानंतर 2022 मध्येही त्यानं टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजार धावा करणारा जगातील पहिल्या फलंदाजाचा मान पटकावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT