Suryakumar Yadav News Saam TV
Sports

Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादवच्या अफलातून फलंदाजीचं रहस्य अखेर उलगडलं, मैदानात नेमका काय करतो?

सूर्यकुमारच्या बहारदार फलंदाजीमागचं रहस्य त्याच्या मित्रानं उलगडलं आहे.

Nandkumar Joshi

Suryakumar Yadav News : क्रिकेटविश्वात सध्या एकच नाव घेतलं जातंय. सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारच्या बॅटमधून निघणाऱ्या फटक्यांमध्ये नजाकत असते. डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके. त्याचा खेळण्याचा अंदाज काही औरच. आता ज्या प्रकारे तो खेळतोय, त्याला रोखणं जगातल्या दिग्गज गोलंदाजांसाठीही कठीण झालंय.

सूर्यकुमार यादवनं टी २० वर्ल्डकपमध्ये ज्याप्रकारे स्फोटक फलंदाजी केली, त्याला तोड नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही तो तळपतोय. दुसऱ्या टी २० सामन्यात सूर्यकुमारनं खतरनाक फलंदाजी केली. अवघ्या ५१ चेंडूंत १११ धावा कुटल्या. भारताला विजय मिळवून दिला. सूर्यकुमारनं सात षटकार आणि ११ चौकार ठोकले. ज्या खेळपट्टीवर इतर फलंदाज फटकेबाजी करताना अडखळतात, तिथे सूर्यकुमार यादव अजब-गजब फटकेबाजी करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. सूर्यकुमारच्या या फलंदाजीमागचं रहस्य त्याचा मित्र आणि माजी कर्णधारानं उलगडलंय. (Cricket News)

विनायक माने असं सूर्यकुमारच्या मित्राचं नाव. मुंबईसाठी तो फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलाय. कॉर्पोरेट क्रिकेटमध्ये तो सूर्यकुमारच्या संघाचा कर्णधार होता. सूर्यकुमार १८ वर्षांचा असताना बीपीसीएल संघातून खेळत होता. तिथंही त्याचा कर्णधार विनायक माने होता. २०१४-१५ हे वर्ष सूर्यकुमारसाठी (Suryakumar Yadav) कठीण होते. मुंबईच्या संघाचं कर्णधारपद गेलं. संघातूनही काही सामन्यांसाठी वगळलं होतं. अशा वाईट काळात त्याला मुंबईच्या पारसी जिमखाना क्लबनं आधार दिला.

विनायक माने यानं स्पोर्ट्स स्टारला दिलेल्या मुलाखतीत सूर्यकुमारच्या अजब-गजब बॅटिंगचं रहस्य उलगडलं. सूर्यकुमार यादव जेव्हा कधी टीम इंडियासाठी खेळतो, तेव्हा तो पारसी जिमखान्यात नक्कीच जातो. तेथील युवा खेळाडूंसोबत तो वेळ घालवतो. त्यांच्यासोबत खेळतो. सूर्यकुमार यादवनं याच मैदानावर ही अप्रतिम फटकेबाजी केली आहे. त्याचे धडे त्याने पारसी जिमखाना क्लबच्या मैदानावरच गिरवले आहेत.

सूर्यकुमार यादव पहिल्यापासूनच स्कूप शॉट्स खेळतो. जेव्हा सूर्यकुमार १८ वर्षांचा होता तेव्हापासून त्याच्या बॅटमधून अशा प्रकारचे फटके बघायला मिळत आहेत. या फटक्यांचा तो खूप वेळ सराव करतो. अलीकडेच तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध स्विप शॉट खेळू लागलाय. सूर्यकुमार यादव फटकेबाजी करताना ताकदीचा वापर करत नाही. तो केवळ टायमिंग आणि वेगाचा फायदा उठवतो, असे माने यानं मुलाखतीत सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे फाईल बाहेर काढणाऱ्या अंजली दमानियांच्या पतीवर सरकार खूश; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Cat Worshipped As Goddess: 'या' देशात मांजरींची होते देवाप्रमाणे पूजा; भक्त अर्पण करायचे सोन्याचे दागिने

SCROLL FOR NEXT