Suryakumar Yadav’s social media post has sparked fresh speculation about his future in Indian cricket. saam tv
Sports

सूर्यकुमार यादवनं क्रिकेटमधून संन्यास घेतला? सोशल मीडिया पोस्टवरून चर्चांना उधाण

Suryakumar Yadav viral post retirement speculation: सोशल मीडियावर सूर्यकुमार यादवशी संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाली आहे.

Bharat Jadhav

  • सूर्यकुमार यादवच्या व्हायरल सोशल मीडिया पोस्टनंतर निवृत्तीच्या चर्चा रंगल्या.

  • चाहत्यांमध्ये संभ्रम आणि सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.

  • सूर्यकुमारला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटवले. सूर्यकुमार यादवला टी-२० संघातूनही वगळण्यात आले, त्याच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्णधार पदावरून सूर्यकुमार यादवला हटवण्यात आल्यानंतर त्याने एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्याच्या या पोस्टवरून क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.

सूर्यकुमार यादवला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. यानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्नांचं काहुर निर्माण झालं. सूर्यकुमार यादवसाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले आहेत का? भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादवची कारकीर्द आता संपली आहे का?

भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्यानंतर सूर्याबद्दल हे प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा प्रश्नांच्या दरम्यान सूर्यकुमार यादवच्या निवृत्तीची घोषणा करणाऱ्या एका सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे. ७ जून रोजी टीम इंडियाचा कर्णधार बदलण्यात आला. दुसऱ्या दिवशी 'X' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सूर्यकुमार यादवने एक पोस्ट केली.

पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्यापासून ते टी-२० विश्वचषक उंचावण्यापर्यंतचा त्याचा प्रवास अद्भुत होता आणि. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आलीय. त्याच्या या पोस्टमुळे सोशल मीडियासह किक्रेट विश्वात खळबळ माजली आहे. सूर्यकुमार यादवची पोस्ट पाहून चाहते आवाक झाले आहेत. त्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल पोस्टचं सत्य काय?

काहींनी त्याच्या शानदार करिअरविषयी शुभेच्छा दिल्या आहेत. पण सत्य हे आहे की सूर्यकुमार यादव यांनी असे काहीही पोस्ट केलेले नाही आणि हे एक 'पॅरोडी' म्हणजेच बनावट खाते आहे. जे मे २०२६ मध्ये तयार करण्यात आले होते आणि त्यावरून केलेली ही एकमेव पोस्ट आहे. सूर्यकुमार यादवने संन्यास घेण्याची घोषणा केली नाहीये. तसेच संन्यास घेण्याबाबत कोणते संकेतही दिले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशात युद्धामुळे इंधनाचे दर वाढले - देवेंद्र फडणवीस

Thread Benefits: लाल, काळा की पिवळा? हातातील धाग्याचा रंग ठरवतो तुमचं भाग्य

उड्डाणपूल प्रकल्पावरून कल्याणमध्ये संघर्ष; बुद्धभूमी फाउंडेशनची न्यायाची मागणी

Shocking : मेट्रो ट्रेनसमोर उडी मारून २२ वर्षीय तरुणीने संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Bollywood Actress: बॉलिवूडच्या पहिल्या १०० कोटींचा चित्रपट देणारी ही अभिनेत्री माहिती आहे का?

SCROLL FOR NEXT