suryakumar yadav need to prove himself in india vs australia series to fix his spot in world cup squad  saam tv
Sports

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेनंतर मिस्टर ३६० ची विकेट पडणार? वर्ल्डकप संघातून होणार सुट्टी

Suryakumar Yadav Record: ऑस्ट्रेलियाविरूद्धची वनडे मालिका ही भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

Ankush Dhavre

India vs Australia:

आशिया चषक जिंकल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे.

ही मालिका वर्ल्डकपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. ही मालिका संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी असू शकते.

सूर्यकुमार यादव हा टी-२० क्रिकेटमध्ये अव्वल नंबरचा फलंदाज आहे. मात्र वनडे क्रिकेटमध्ये त्याला आतापर्यंत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला अनेकदा संधी देण्यात आली आहे.

मात्र तो स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. तो नावाला साजेशी कामगिरी करत नसला तरीदेखील त्याची वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका २७ सप्टेंबरला समाप्त होणार आहे.

तर २८ सप्टेंबर ही वर्ल्डकप संघात बदल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. जर ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादवची बॅट तळपली नाही, तर त्याचा वर्ल्डकप संघातून पत्ता कट होऊ शकतो.

सूर्यकुमार यादवच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या २५ डावांत २४.४० च्या सरासरीने ५३७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतक झळकावले आहेत.

आशिया चषकात बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याला संधी मिळाली होती. मात्र त्याला या संधीचा फायदा घेता आला नव्हता. तो अवघ्या २६ धावा करत माघारी परतला. त्याने वनडेतील शेवटचं अर्धशतक १९ महिन्यांपू्र्वी झळकावलं होतं. (Latest sports updates)

संघात टिकून राहण्यासाठी धावा करणं गरजेचं..

सूर्यकुमार यादवला वर्ल्डकप संघात टिकून राहायचं असेल तर धावा करणं गरजेचं आहे. कारण तो धावा करू शकला नाही, तर त्याच्याऐवजी तिलक वर्माला संधी दिली जाऊ शकतो. हा खेळाडू फलंदाजीसह गोलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT