Suryakumar yadav  saam tv
Sports

Suryakumar yadav : सूर्यकुमारला एकदिवसीय सामन्यात करिष्मा दाखवण्याची संधी; ODI विश्वचषकातही होऊ शकते एन्ट्री

मालिकेत स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला फलंदाजीचा करिष्मा दाखवण्याची संधी आहे

Vishal Gangurde

Suryakumar yadav News : श्रीलंकेनंतर टीम इंडिया मायदेशात न्यूझीलँडच्या विरुद्ध ३ एक दिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना १८ जानेवारीला हैदराबादमध्ये खेळला जात आहे. या मालिकेत स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला फलंदाजीचा करिष्मा दाखवण्याची संधी आहे. (Latest Marathi News)

टी-२० क्रमवारीमध्ये सूर्यकुमार क्रमांक एकचा फलंदाज आहे. आतापर्यंत सूर्यकुमारने १७ एकदिवसीय सामने खेळला आहे. मात्र, या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) फार काही कमाल दाखवू शकला नाही. सूर्याने २९.८४ टक्केच्या सरासरीने ३८८ धावा कुटल्या आहेत. टी-२० सामन्यातील प्रदर्शन पाहून एकदिवसीय सामन्यात संधी मिळाली आहे.

सूर्याला तिन्ही एकदिवसीय सामन्यात संधी मिळू शकते

न्यूझीलँडच्या विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यर आणि केएल राहुल बाहेर झाला आहे. श्रेयसच्या पाठीला दुखापत झाली आहे. तर राहुलने लग्नासाठी सुटी घेतली आहे. या मालिकेत तिन्ही सामन्यात सूर्यकुमार संधी मिळू शकते. सूर्यकुमारने या मालिकेत चांगलं प्रदर्शन दाखवलं, तर ODI विश्वचषकाच्या टीम इंडियाच्या (Team India) संघात स्थान मिळू शकतं.

सूर्यकुमारचं क्रिकेट कारकिर्द

१७ वनडे सामने : ३८८ धावा - २ अर्धशतक

४५ टी-२० सामने : १५७८ धावा - ३ शतक

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि मोहम्मद शमी.

न्यूझीलंडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, सँटनर, ईश सोधी, फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि अटा ब्रेसवेल, मिचेल सेंटनर, डग ब्रेसवेल , हेनरी शिपले, लॉकी फर्ग्यूसन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

प्रवीण गायकवाड यांना काळं फासलं; संभाजी ब्रिगेड आक्रमक

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

SCROLL FOR NEXT