suryakumar yadav google
Sports

हम साथ '७' है! सूर्यानं पुन्हा मन जिंकलं, आशिया चषकातील सगळे पैसे आर्मीला दिले

Suryakumar Yadav News : आशिया चषकातील सात सामन्यांचे मानधन आर्मी आणि पहलगाममधील मृताच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय सूर्यकुमार यादवने घेतला आहे. सूर्याच्या या निर्णयाचे देशात कौतुक होतेय.

Namdeo Kumbhar

Suryakumar Yadav latest News Update : 'एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे सूर्यदादा... होय सूर्यकुमार यादव याने पुन्हा एकदा भारतीयांचे मन जिंकलेय. आशिया चषकातील सर्व सात सामन्याची रक्कम इंडियन आर्मीला आणि पहलगाम हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय सूर्यकुमार यादव याने घेतला आहे. रविवारी रात्री दुबईच्या मैदानावर भारताने पाकिस्तानचा पाच विकेट्सने पराभव करत आशिया चषकावर नवव्यांदा नाव कोरलं. तिलक वर्मा, कुलदीप यादव, शिवम दुबे अन् संजू सॅमसन विजयाचे शिल्पकार ठरले. भारताच्या विजयानंतर सूर्यकुमार यादवने मोठी घोषणा केली. सामन्याचे मानधन आर्मी अन् पहलगाम हल्ल्यातील मृताच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोशल मीडियावर सूर्याचे कौतुक केले जात आहे. दरम्यान, सूर्यकुमार यादव याने एक्सवरही याबाबत पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

दुबईच्या मैदानात रविवारी रात्री भारताने पाकिस्तानला धूळ चारली. आशिया कपच्या अंतिम सामन्यात तिलक वर्माने शानदार अर्धशतक झळकावले. संजू सॅमसन व शिवम दुबे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भागीदारी करत विजय खेचून आणला. या विजयासह भारताने आपला दुसरा टी20 आंतरराष्ट्रीय आशिया कप विजेतेपद आणि एकदिवसीय प्रकारासह एकूण नववा किताब जिंकला. भारताच्या विजयानंतर सर्वच स्तरावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठी घोषणा केली. तो म्हणाला की, “मी आशिया चषक स्पर्धेतील सर्व सामन्यांची (७) माझी मॅच फी (मानधन) भारतीय सैन्याला दान करणार आहे. ” सामन्यानतर झालेल्या पुरस्कार सोहळ्यात भारतीय संघाने मेडल्स आणि ट्रॉफी स्वीकारली नाही. त्यामुळे पाकिस्तानी प्रेक्षक आणि खेळाडूंमध्ये निराशा पसरली. आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी भारतीय संघाला ट्रॉफी देण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय खेळाडूंनी ती स्वीकारण्यास नकार दिला. संपूर्ण भारतीय संघाने ट्रॉफीशिवायच मैदानावर विजयोत्सव साजरा केला.

आशिया चषकाच्या पहिल्या दिवसापासूनच भारतीय संघाने पाकिस्तानवर कुरघोडी केली. हँडशेक, फोटोसेशन, प्रेस कॉन्फर्नसला न जाणं या गोष्टी भारताने पाकिस्तानसोबत करणं टाळलं. अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारताने पाकिस्तानी अध्यक्ष नक्वी यांच्याकडून चषक घेण्यास नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: मुरलीधर मोहोळ यांच्याकडील पांढऱ्या रंगाची कार नेमकी कुणाची? रवींद्र धंगेकरांनी नव्या पोस्टद्वारे फोडला बॉम्ब

Gold Necklace News : घरातल्या कचऱ्यासोबत सोन्याचा हारही फेकला, सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, महिलेला परत आणून दिला दागिना

Post Diwali Care: दिवाळीनंतर खूप थकवा अन् चेहरा डल दिसतोय? मग हे सोपे उपाय ठरतील बेस्ट

laughter chefs 3: सहा महिन्यांतच 'लाफ्टर शेफ्स'च्या नव्या सीझनची सुरुवात; 'हे' फेमस स्टार्स लावणार कॉमेडीचा तडका

Maharashtra Live News Update: ऐन दिवाळीमध्ये गांधीनगर व्यापार पेठेत फोडली ८ ते १० दुकाने

SCROLL FOR NEXT