suryakumar yadav twitter
क्रीडा

Suryakumar Yadav: सूर्याने इतिहास रचला! T20I क्रिकेटमध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच भारतीय फलंदाज

Fastest 2500 Runs For India in T20I Cricket: भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने हैदराबादच्या मैदानावर तुफान फटकेबाजी केली. प्रथम फलंदाजी करताना सूर्याने संजू सॅमसनसोबत विक्रमी भागीदारी केली. संजू सॅमसनने शतक पूर्ण केलं. तर सूर्यकुमार यादव ७५ धावा करत माघारी परतला. यादरम्यान त्याच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनच्या खेळीच्या बळावर भारतीय संघाने स्कोअर बोर्डवर २९७ धावा लावल्या. ७५ धावांच्या खेळीसह सूर्यकुमार यादवने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५०० धावा केल्या आहेत. यासह तो टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा पूर्ण करणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने हा कारनामा ७१ व्या सामन्यात केला आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन यांनी मिळून ७० चेंडूत १७३ धावांची भागीदारी केली. भारतीय संघासाठी टी -२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा करण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावे आहे. विराट कोहलीने हा कारनामा ६२ सामन्यांमध्ये करून दाखवला होता.

पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने हा कारनामा ६५ व्या इनिंगमध्ये केला होता. या यादीत भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माचा देखील समावेश आहे. रोहितने हा कारनामा ९२ व्या इनिंगमध्ये करून दाखवला होता.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ गडी बाद २९७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला ७ गडी बाद १६४ धावा करता आल्या. भारतीय संघाने हा सामना १३३ धावांनी आपल्या नावावर केला. यासह भारतीय संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ब्रह्म मुहूर्तावर 'या' शब्दांचा जप करणं आहे शुभं, वर्षभर घरी येईल पैसा

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

SCROLL FOR NEXT