PAK vs ENG: १४७ वर्षांच्या इतिहासात सर्वात लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने पाकिस्तानची लाज काढली

Pakistan vs England 1st Test: इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आहे.
PAK vs ENG: १४७ वर्षांच्या इतिहासात सर्वात लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने पाकिस्तानची लाज काढली
englandtwitter
Published On

Pakistan vs England 1st Test: इंग्लंडचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना मुल्तानमध्ये पार पडला. या सामन्यात फलंदाजी करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी एकापेक्षा एक मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले.

उरलेलं काम इंग्लंडच्या गोलंदाजांनी पूर्ण केलं. दरम्यान हा सामना इंग्लंडने १ डाव आणि ४७ धावांनी आपल्या नावावर केला आहे. दरम्यान या पराभवासह पाकिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद झाली आहे.

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हाय स्कोरिंग सामना ठरला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानने ५५६ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी रेकॉर्डब्रेक फलंदाजी केली.

इंग्लंडने ८२३ धावा केल्या. यासह इंग्लंडने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानचा डाव अवघ्या २२० धावांवर आटोपला. यासह पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात ५०० हून अधिक धावा करुनही १ डाव राखून पराभूत होणारा क्रिकेट विश्वातील पहिलाच संघ ठरला आहे.

PAK vs ENG: १४७ वर्षांच्या इतिहासात सर्वात लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने पाकिस्तानची लाज काढली
IND vs BAN: शेवटच्या टी-२० सामन्यात टीम इंडियाची Playing XI बदलणार; या तिघांना संधी मिळणार

पाकिस्तानने केल्या ५५६ धावा

पाकिस्तानच्या फ्लॅट ट्रॅकवर गोलंदाजांची चांगलीच धुलाई झाली. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने १४९ षटक फलंदाजी केली. यादरम्यान पाकिस्तानकडून फलंदाजी करताना कर्णधार शान मसूदने १५१ धावांची खेळी केली. तर अब्दुल्ला शफीकने १०२ धावांची खेळी केली. त्यानंतर सौद शकीलनेही ८२ धावा केल्या. या खेळीसह पाकिस्तानने पहिल्या डावात धावांचा पाऊस पाडला.

PAK vs ENG: १४७ वर्षांच्या इतिहासात सर्वात लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने पाकिस्तानची लाज काढली
IND vs BAN: IPL गाजवणाऱ्या Harshit Ranaला टीम इंडियात संधी का मिळत नाहीये? समोर आलं मोठं कारण

इंग्लंडने उभारला ८२३ धावांचा डोंगर

पाकिस्तानने ५०० धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंडनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जो रुटने २६२, हॅरी ब्रुकने ३१७ धावांची खेळी केली. तर बेन डकेटने ८४ धावांची खेळी करत इंग्लंडचा डाव ८२३ धावांवर पोहोचवला. या धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव २२० धावांवर आटोपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com