Team India playing 11: भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील अंतिम सामना आज चेन्नईच्या मैदानावर पार पडणार आहे.
सध्या ही मालिका १-१ ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांना ही मालिका जिंकण्याची समान संधी असणार आहे.
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय खेळाडूंनी जोरदार कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले होते. हा सामना जिंकून भारतीय संघाने १-० ची आघाडी घेतली होती. (Latest sports updates)
तर विशाखापट्टणममध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. मात्र भारतीय संघात असा एक फलंदाज आहे जो दोन्ही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे.
भारतीय संघातील आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादवला (Suryakumar yadav) स्वतः ला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.
मात्र तो चांगली कामगिरी करण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातही तो स्वस्तात माघारी परतला आहे. ही निराशाजनक कामगिरी पाहता त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर केले जाऊ शकते.
सूर्यकुमार यादव टी -२० क्रिकेटमध्ये हिट ठरतोय. मात्र वनडेमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. त्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये ६४ धावांची खेळी केली होती. ही त्याची वनडेतील सर्वोत्तम खेळी ठरली होती.
त्यानंतर त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती. त्यानंतर त्याने १३ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने केवळ २ वेळा ३० धावांचा पल्ला गाठला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.