MI vs GT Match Updates Saam TV
Sports

MI vs GT Match Updates: नाद करा पण सूर्याचा कुठं! वानखेडेवर गुजरातला बेक्कार चोपलं; मुंबईने उभारला धावांचा डोंगर

MI vs GT Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५७ वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू आहे.

Satish Daud

MI vs GT Match Updates: आयपीएलच्या १६ व्या हंगामातील ५७ वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना गुजरातसमोर २१९ धावांचं लक्ष ठेवलं आहे. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने वादळी शतक ठोकलं. त्याने ४९ चेंडूत १०३ धावांची तुफानी खेळी केली.

प्ले-ऑफच्या दृष्टीने दोन्ही संघासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय रोहित शर्मा आणि इशान किशनने असार्थ ठरवला. (Latest sports updates)

मुंबई इंडियन्सचे दोन्ही सलामीवीर पावरप्लेमध्ये गुजरातच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडले. गेल्या काही सामन्यापासून दुहेरी आकडाही न गाठू शकणाऱ्या रोहित शर्माने अखेर आपला जुना खेळ दाखवण्यास सुरूवात केली. इशान किशन आणि रोहित शर्माने चौथ्या पाचव्या षटकातच मुंबईला अर्धशतकी मजल मारून दिली.

मुंबई इंडियन्सने ६ षटकात १० च्या सरासरीने ६१ धावा केल्यानंतर त्यांचा डाव गडगडला. राशिद खानने रोहित शर्माला २९ धावांवर बाद केले. त्यानंतर राशिदने इशान किशनची २० चेंडूतील ३१ धावांची खेळी खेळी देखील संपवली. यानंतर नेहल वधेराला १५ धावांवर बाद करत मुंबईची अवस्था ३ बाद ८८ अशी केली.

दरम्यान, सलग तीन धक्के बसल्यानंतर सूर्यकुमार यादव हा मैदानावर फलंदाजीसाठी आला. त्याने युवा फलंदाज विष्णू विनोदच्या मदतीने गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. गेल्या काही सामन्यापासून फॉर्ममध्ये नसलेल्या सूर्यकुमारला या सामन्यात चांगलीच लय सापडली.

सूर्यकुमारने अगदी अडचणीच्या वेळी चांगली खेळी करून मुंबईला संकटातून बाहेर काढले. त्याने विष्णू विनोदच्या मदतीने वादळी खेळी करत मुंबईला २०० धावांचा डोंगर उभारून दिला. डावाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं.

सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत १०३ धावा कुटल्या. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ६ षटकार खेचले. गुजरातकडून राशिद खानने ४ षटकात ३० धावा देत ४ गड्यांना बाद केलं. राशिद खान वगळता गुजरातचे इतर गोलंदाज हे धावा रोखण्यात अपयशी ठरले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने सहा मोटरसायकल जाळल्या

Sara Arjun: रणवीर सिंगसोबत 'धुरंधर' चित्रपटात झळकणारी अभिनेत्री नक्की आहे तरी कोण?

Manikgad Fort Tourism : नयनरम्य निसर्ग अन्...; पनवेलपासून हाकेच्या अंतरावर वसलाय ऐतिहासिक किल्ला, एकदा पाहाच...

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधानची नवीन मालिका कोणती?

Bullet Train: मुंबईकर प्रवाशांसाठी गुड न्यूज! मुंबईतील २ मेट्रो बुलेट ट्रेनला जोडणार

SCROLL FOR NEXT