ind vs nz Saam tv
Sports

सूर्यकुमार-शिवमची बॅट तळपली; भारताचा न्यूझीलंडवर दमदार विजय

ind vs nz : न्यूझीलंडविरोधात सूर्यकुमार-शिवमची बॅट तळपली. भारताने न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला आहे.

Vishal Gangurde

टीम इंडियाची दमदार खेळी

न्यूझीलंडने दिलेल्या धावसंख्येचा सूर्यकुमार-शिवमने यशस्वी पाठलाग केला

टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

टीम इंडियाने शुक्रवारी टी२० सामन्यात ७ गडी राखून न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवला. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा सूर्यकुमार-शिवमने यशस्वी पाठलाग केला. भारताच्या आक्रमक फलंदाजीपुढे न्यूझीलंडच्या गोलंदगाजांनी गुडघे टेकले. न्यूझीलंडविरोधातील सीरीजमध्ये टीम इंडियाने सलग दुसरा विजय मिळवला आहे.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून २०८ धावा कुटल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे लवकर बाद झाले. या दोघानंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादवने धमाकेदार फलंदाजी केली. भारताने ७ गडी राखून न्यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडियाने सीरीजमध्ये २-० ने आघाडी घेतली आहे.

२०९ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. टीम इंडियाने ७ चेंडूच्या आतच दोन गडी गमावले होते. संजू सॅमसन पाच चेंडूत ६ धावा करून बाद झाला. तर अभिषेक शर्मा शून्य धावांवर बाद झाला. ईशान किशनने ३२ चेंडूत ७६ धावांची तुफानी खेळी खेळली. त्याने डावात ११ चौकार आणि ४ षटकार लगावले. तर सूर्यकूमारने ३७ चेंडूत ८२ नाबाद धावा केल्या. शिवम दुबेने १८ चेंडूत ३६ धावा केल्या.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून २०८ धाव केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेलने सर्वाधिक धावा कुटल्या. भारतासाठी कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. तर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु टीम इंडियाने यशस्वी पाठलाग केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT