Sunrisers Hyderabad vs Punjab Kings  
क्रीडा

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटही कडू; ४ विकेट राखून हैदराबादचा विजय,Points Table मध्ये राजस्थानची घसरण

Sunrisers Hyderabad vs Punjab Kings : हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या नशीबाने त्यांची साथ दिली नाही.

Bharat Jadhav

आयपीएलचा स्पर्धेतील ६९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झाला. या सामन्यात हैदाराबादने ४ विकेट राखत विजय मिळवलाय. या विजयासह हैदराबादने राजस्थानच्या संघाला फटका बसलाय. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादने राजस्थानच्या संघाला पिछाडत दुसऱ्या स्थानी विराजमान झालाय. या पॉईट टेबलमध्ये आता कोलकाताचा संघ पहिल्या स्थानी आहे, तर हैदराबादचा संघ दुसऱ्या स्थानी आलाय आणि तिसऱ्यास्थानी राजस्थान रॉयल्सचा संघ आलाय.

आयपीएलचा स्पर्धेतील ६९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झाला. या सामन्यात हैदाराबादने ४ विकेट राखत विजय मिळवलाय. या विजयासह हैदराबादने राजस्थानच्या संघाला फटका बसलाय. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादने राजस्थानच्या संघाला पिछाडत दुसऱ्या स्थानी विराजमान झालाय. या पॉईट टेबलमध्ये आता कोलकाताचा संघ पहिल्या स्थानी आहे, तर हैदराबादचा संघ दुसऱ्यास्थानी आलाय आणि तिसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्सचा संघ आलाय.

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर पंजाबच्या संघाने या स्पर्धेतील अखेरचा सामना खेळला. आपल्या अखेरच्या सामन्यातही पंजाब किंग्जचे किंग हैदराबादसमोर ढेर झालेत. सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने २० षटक अखेर २१४ धावा केल्या होत्या. पंजाबने दिलेल्या २१५ धावांचे आव्हान हैदराबादने १९.१ षटकात ६ विकेट गमावत पार केलं.

या सामन्यात स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिसचे हेड फ्लॉप ठरला,पण अभिषेक शर्मा त्याच जुन्या अंदाजात दिसला.त्याने झटपट अर्धशतक झळकावून संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. अभिषेकने २८ चेंडूचा सामना करत ६६ धावा केल्या, यात ४ चौकार आणि ६ षटकाराचा समावेश आहे. अभिषेकच्या या तडाखेबाज फलंदाजीसाठी त्याला प्लेअर ऑ द मॅच म्हणून घोषित करण्यात आले. अभिषेकनंतर हेनरिक क्लासेनने ४२ धावा करत पंजाबच्या संघाला पराभवाची चव चाखायला लावली.

हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघाने चांगली सुरुवात केली, अथर्व तायडे आणि प्रभसिमरन सिंगने शानदार फलंदाजी केली. प्रभासिमरनने अवघ्या ४५ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्यानंतर अथर्वने २७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४६ धावा केल्या. रिले रुसनेही जबरदस्त ४९ धावा केल्या. शेवटी जितेश शर्मानेही ३२ धावा करत संघाची धावसंख्या २१४ पर्यंत पोहोचवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शिवडी विधानसभेत ठाकरे गटाची बाईक रॅली

Rahul Gandhi: एक है तो सेफ है...., मोदी सरकारच्या नाऱ्याची राहुल गांधींनी उडवली खिल्ली, थेट व्हिडीओ दाखवला

Amit Shaha News : सत्ता स्थापनेच्या बैठकीत शरद पवार होते? अमित शहा यांचा मोठा खुलासा, पाहा Video

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT