sunrisers hyderabad or rajasthan royals know who will play playoff eliminator with royal challengers bengaluru amd2000 saam tv news
क्रीडा

IPL 2024 Playoffs: RCB चा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघाविरुद्ध खेळणार? समजून घ्या समीकरण

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ पंजाब किंग्ज संघाचा सामना करताना दिसून येणार आहे.तर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ राजस्थान रॉयल्स संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता गुवाहाटीमध्ये रंगणार आहे. दरम्यान या दोन्ही सामन्यानंतर प्लेऑफचं चित्र पूर्णपणे बदलणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ प्लेऑफमध्ये कोणत्या संघासोबत भिडणार हे आज स्पष्ट होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांचा सामना झाल्यानंतर कोलकाताचा संघ पहिल्या स्थानी, राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानी, हैदराबादचा संघ तिसऱ्या स्थानी आणि बंगळुरुचा संघ चौथ्या स्थानी आहे.

रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार?

समीकरण १ - पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ जिंकला, राजस्थानचा संघ पराभूत झाला. तर हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहचेल. तर राजस्थानचा संघ दुसऱ्या क्रमांकावरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहचेल. या समीकरणानुसार राजस्थानचा संघ बंगळुरुविरुद्ध सामना करताना दिसेल.

समीकरण २-

राजस्थानने शेवटचा सामना जिंकला आणि हैदराबादने शेवटचा सामना गमावला, तर गुणतालिकेत फरक पडणार नाही. असे झाल्यास हैदराबादचा संघ बंगळुरुचा सामना करताना दिसून येईल.

समीकरण ३ -

राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांनी आपल्या शेवटच्या सामन्यात विजय मिळवला तरी गुणतालिकेत फारसा फरक पडणार नाही. असं झाल्यास बंगळुरुचा संघ हैदराबाद संघाचा सामना करताना दिसून येईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. सध्या हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT