sunrisers breaks the big record of rcb of socring 250 or more runs 3 times in this ipl amd2000 twitter
Sports

DC vs SRH, IPL 2024: हैदराबादने पुन्हा एकदा मोडला RCB चा मोठा रेकॉर्ड! IPL इतिहासात असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच संघ

Sunrisers Hyderabad Breaks RCB Record: हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाने ६८ जिंकला. दरम्यान या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Ankush Dhavre

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात अनेक मोठ मोठे रेकॉर्ड मोडले गेले. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २६६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाला २० षटकअखेर १९९ धावा करता आल्या. हा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाने ६८ धावांनी जिंकला. दरम्यान या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २६६ धावांचा डोंगर उभारला. याच हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने तिसऱ्यांदा २५० पेक्षा अधिकची धावसंख्या उभारली आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस २५० पेक्षा अधिक धावा करण्याची नोंद आता सनरायझर्स हैदराबाद संघाच्या नावे झाली आहे. या यादीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.

या संघाने २ वेळेस असा कारनामा करून दाखवला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये झालेल्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २६३ धावा केल्या आहेत. त्यानंतर याच वर्षी फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना या संघाने २६२ धावा केल्या.

या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा संघ आक्रमक मोडमध्ये आहे. या संघाने पहिल्या सामन्यापासूनच गोलंदाजांवर हल्लाबोल केला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्स,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि आता दिल्ली कॅपिटल्सविरुध्द २५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध खेळताना या संघाने २८७ धावांचा डोंगर उभारला होता. ही या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तुफान फटकेबाजी..

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. हैदराबादला ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने दमदार सुरूवात करून दिली. अभिषेक शर्माने १२ चेंडूत ४९ धावा केल्या. तर ट्रेविस हेडने ११ चौकार आणि ६ षटकारांचा साहाय्याने २९ चेंडूत ८९ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanya Mittal Ex Boyfriend Arrested: 'बिग बॉस १९' फेम तान्या मित्तलच्या एक्स बॉयफ्रेंडला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

Govind Barge case : गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, पूजाचे पाय आणखी खोलात, वाचा सविस्तर

Gold Rate Today: खुशखबर! आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं झालं स्वस्त; वाचा २४ कॅरेटचे आजचे दर

‘Bigg Boss 19’ मध्ये फराह खान अमाल मालिकवर नाराज, नेहल चुडासमाला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT