RCB vs SRH: फाफ डू प्लेसिस बाद होताच काव्या मारनचा आनंद गगनात मावेना! भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Kaviya Maran Dance Video: फाफ डू प्लेसिस आऊट होताच काव्या मारनला इतका आनंद झाला की, ती थेट डान्स करू लागली. तिचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
RCB vs SRH: फाफ डू प्लेसिस बाद होताच काव्या मारनचा आनंद गगनात मावेना! भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल
Kaviya Maran dance after faf du plessis wicket video went viral amd2000twitter
Published On

चिन्नास्वामीच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर २८७ धावा केल्या. ही या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली.

तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने देखील दमदार सुरुवात केली. या संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दरम्यान फाफ डू प्लेसिस आऊट होताच काव्या मारनला इतका आनंद झाला की, ती थेट डान्स करू लागली. तिचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आयपीएल इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानेही आक्रमक सुरुवात केली. कर्णधार फाफ डू प्लेसिसने २८ चेंडूत ६२ धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि ४ षटकार मारले. तो ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता ते पाहता त्याने संघाला नक्कीच विजय मिळवून दिला असता. मात्र १० व्या षटकात पॅट कमिन्सने त्याला बाद करत माघारी धाडलं. या षटकातील तिसरा चेंडू कमिन्सने शॉर्ट टाकला. ज्यावर फाफ डू प्लेसिसने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत यष्टिरक्षकाच्या हातात गेला.

RCB vs SRH: फाफ डू प्लेसिस बाद होताच काव्या मारनचा आनंद गगनात मावेना! भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल
Dinesh Karthik Six: दिनेश कार्तिकने खेचला IPL 2024 स्पर्धेतील सर्वात लांब षटकार! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर- Video

फाफ डू प्लेसिस बाद झाला हे पाहून काव्या मारनचा आनंद गगनात मावेनासा झाला. काव्या मारन आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि संघाचा उत्साह वाढवण्यासाठी प्रत्येक सामन्याला हजर राहते. फलंदाज बाद झाल्यानंतर ती भावुक होते. तर चौकार आणि षटकार मारल्यानंतर जल्लोष देखील साजरा करते.

या डोंगराइतक्या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २६२ धावांपर्यंत मजल मारली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने हा सामना केवळ २५ धावांनी गमावला. या संघाकडून दिनेश कार्तिकने सर्वाधिक ८३ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com