Rishabh pant and dinesh kartik
Rishabh pant and dinesh kartik saam tv
क्रीडा | IPL

रिषभ पंत की दिनेश कार्तिक? टी-२० विश्वचषकात कुणाला दिली पाहिजे संधी, गावस्कर म्हणाले....

नरेश शेंडे

नवी दिल्ली : आगामी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी (T-20 world cup) भारतीय क्रिकेट संघाने खेळाडू्ंच्या स्क्वॉडची घोषणा केली आहे. पण अजूनही काही गोष्टींबाबत गोंधळ असल्याचं समोर आलं आहे. रिषभ पंत आणि (Dinesh karthik) दिनेश कार्तिक या दोघांपैकी कुणाला प्लेईंग इलेव्हन मध्ये घ्यायचं, याबाबत अजूनही निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक यांच्या टी-२० विश्वचषकाच्या निवडीवरून चर्चा रंगल्या असतानाच आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मत व्यक्त केलं आहे. विश्वचषकात दोन्ही खेळाडूंचा समावेश केला पाहिजे, असं गावस्कर यांचं म्हणण आहे. (Sunil Gavaskar talks about rishabh pant and dinesh karthik)

टी-२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियात होणार आहे. या विश्वचषकासाठी टीम इंडियाने नुकताच खेळाडूंचा स्क्वॉड जाहीर केला आहे. यावर सुनिल गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गावस्कर म्हणाले, प्लेईंग ११ मध्ये रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक या दोघांचाही समावेश केला पाहिजे. पाचव्या नंबरसाठी रिषभ पंत,सहाव्या नंबरवर हार्दिक पंड्या, त्यानंतर सातव्या नंबरवर दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी पाठवू शकता.

संघात हार्दिक पंड्याच्या व्यतिरिक्त चार गोलंदाजांचा विकप्ल असू शकतो. जर तुम्ही रिस्क नाही घेणार तर जिंकणार कसं? तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये धोका पत्करावाच लागेल. रिषभ पंतने टी-२० फॉर्मेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली नाहीय. पण दिनेश कार्तिकने आयपीएल २०२२ नंतर त्याच्या खेळामध्ये खूपच सुधारणा केली आहे. विशेष म्हणजे कार्तिक फिनिशर म्हणून चमकदार कामगिरी करत आहे.

टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार),केएल राहुल (उप-कर्णधार),विराट कोहली,सूर्यकुमार यादव,दीपक हुड्डा,ऋषभ पंत (विकेटकीपर),दिनेश कार्तिक (विकेटकीपर),हार्दिक पंड्या, आर आश्विन,युजवेंद्र चहल,अक्षर पटेल,जसप्रीत बुमराह,भुवनेश्वर कुमार,हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.

स्टॅंडबाय खेळाडू : मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई, दीपक चहर

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Breaking News: रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार: नारायण राणेंना विश्वास

Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानच्या 'मुन्नी'ला आता पाहिलं का?, ओळखणं ही झालंय कठीण

Ramdev Baba : रामदेव बाबा यांना सुप्रीम कोर्टाचा झटका; न्यायालयाने पुन्हा याचिका फेटाळली, IMA च्या अध्यक्षांनाही बजावली नोटीस

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकरांना ईव्हीएमची पुजा भोवणार?

SCROLL FOR NEXT