R Ashwin  Saam digital
Sports

Sunil Gavaskar On R Ashwin: अश्विनला का नाही खेळवलं? रोहित शर्माच्या निर्णयावरून दिग्गज क्रिकेटपटू संतापले..

IND VS AUS LIVE: माजी भारतीय क्रिकेटपटूने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने आश्चर्यचकित करणारा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या प्लेइंग ११ मधून अश्विनला वगळण्यात आलं आहे. त्याच्या ऐवजी जडेजाला संधी दिली गेली आहे.

तसेच संघात ४ वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

भारतीय संघाची प्लेइंग ११ जाहीर होताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या यादीत आर अश्विनचं नाव नव्हतं. त्याला बाहेर बसवल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कसोटी गोलंदाजांच्या यादीत आर अश्विन हा अव्वल स्थानी असलेला गोलंदाज आहे.

याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, ' ऑस्ट्रेलियाच्या संघात ५ डाव्या हाताचे फलंदाज आहेत. ज्यात डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मिचेल स्टार्क आणि ॲलेक्स कॅरीचा समावेश आहे. असं असताना देखील तुमच्या प्लेइंग ११ मध्ये एकही ऑफ स्पिनर नाही. असं का? हा निर्णय समजण्या पलिकडचा आहे.' (Latest sports updates)

सौरव गांगुली काय म्हणाले ?

याबाबत बोलताना माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, ' गेल्या काही वर्षांमध्ये ४ गोलंदाजांनी देखील सामने जिंकून दिले आहेत. प्रत्येक कर्णधार वेगळा असतो. त्याचे विचार वेगळे असतात. रोहित आणि माझे विचार वेगळे आहेत. जर मी कर्णधार असतो तर मी अश्विनला कधीच बाहेर ठेवलं नसतं.'

तसेच ते पुढे म्हणाले की, ' जर संघात आर अश्विन, हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे सारखे गोलंदाज आहेत,तर परिस्थिती कशी ही असली तरी त्यांना खेळवणं गरजेचं आहे. '

काय म्हणाले रिकी पाँटिंग?

आर अश्विनला बाहेर ठेवल्याने रिकी पाँटिंगने देखील नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ' खेळ जसा पुढे जाईल तशी खेळपट्टी बदलेल. अश्विनने डाव्या हाताच्या फलंदाजांची अडचण वाढवली असती. मात्र त्याला संधी मिळाली नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT