Bishan Singh Bedi:  Twitter
Sports

Bishan Singh Bedi: कपडे धुऊन बोटं फिरकी गोलंदाजीसाठी मजबूत केली अन् घडला चमत्कार! वाचा बिशन सिंग बेदी यांचा हटके किस्सा

Bishan Singh Bedi News: वाचा बिशन सिंग बेदी यांचा हटके किस्सा..

Ankush Dhavre

Bishan Singh Bedi News:

भारतीय संघातील ते फिरकी गोलंदाज जे एकाच गोलंदाजी ॲक्शनने ४ वेगवेगळ्या प्रकारचा चेंडू टाकायचे. जगातील सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा शेन वॉर्नही त्यांना आदर्श मानायचा. अशा दिग्गज भारतीय गोलंदाज बिशन सिंग बेदी यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून ते अस्वस्थ होते.

बिशन सिंग बेदी यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यातून केली होती. १९६६ मध्ये ते आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरले होते. त्यांनी १२ वर्षे भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं.

यादरम्यान त्यांनी केवळ गोलंदाजीमध्ये नव्हे तर नेतृत्वातही नाव कमावलं. त्यांच्या कारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर, ६७ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी २६६ गडी बाद केले. तर २२ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे १५६० गडी बाद करण्याची नोंद आहे, जो एक रेकॉर्ड आहे.

बिशन सिंग बेदी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हाताची बोटं ही त्यांच्या गोलंदाजीची ताकद होती. हेच कारण आहे की, आपल्या बोटांना मजबूत आणि लवचिक करण्यासाठी आपले कपडे स्वत:च धुवायचे. त्यामुळे त्यांची बोटं मजबूत झाली आणि चेंडू फिरवणं सोपं झालं. (Latest sports updates)

भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ १९७८ मध्ये आमने सामने आले होते. या सामन्यात बिशन सिंग बेदी यांच्या रुद्रवतारामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर झाले असे की, भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८ चेंडूंमध्ये २३ धावांची गरज होती. त्यावेळी ८ फलंदाज शिल्लक होते.

या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज सरफराज नवाजने सलग ४ बाऊंसर टाकले. तरीही अंपायरने वाईड चेंडू दिला नव्हता. हे पाहून बिशन सिंग बेदी भडकले आणि त्यांनी आपल्या फलंदाजांना मैदान सोडण्यास सांगितलं. बिशन सिंग बेदींनी घेतलेल्या या निर्णयामुळे भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT