australia saam tv
Sports

स्टीव्ह स्मिथचं Bad Luck! चॅम्पियन्स ट्रॉफीत तिसऱ्यांदा असं घडलं; ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडणार?

AUS vs SA: स्टीव्ह स्मिथचं चॅम्पियन्स ट्रॉफीतील बॅडलक सुरुच आहे. स्मिथ कर्णधार असताना तिसऱ्यांदा सामना रद्द झाला आहे. दरम्यान कसं आहे ऑस्ट्रेलिसाठी समीकरण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. या स्पर्धेत मंगळवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना होणार होता. मात्र या सामन्यावर पावसाचं सावट होतं.

त्यामुळे हा सामना होऊच शकला नाही. हा सामना ड्रॉ झाल्यामुळे सेमी फायनलमध्ये जाण्याची चुरस आणखी वाढली आहे. आता ऑस्ट्रेलियावर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं संकट ओढावलं आहे. ऑस्टेलियाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर आहे. दरम्यान स्टीव्ह स्मिथसोबत असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही.

१५ वर्षात ३ सामने रद्द..

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही ४ वेळेस पावसामुळे सामना रद्द झालाय. मुख्य बाब म्हणजे ४ पैकी ३ सामने रद्द झाले तेव्हा स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा कर्णधार राहिला आहे. यावेळीही ऑस्ट्रेलियाची जबाबदारी स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर आहे. मुख्य बाब म्हणजे, हा सामना ऑस्ट्रेलियाला सेमीफायनल गाठण्यासाठी अतिशय महत्वाचा होता. आता ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये कशी पोहोचणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कसं आहे ऑस्ट्रेलियासाठी समीकरण?

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना रद्द झाल्यानंतर, दोन्ही संघांना प्रत्येकी १–१ गुण देण्यात आला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघांनी २ सामने खेळले आहेत. यादरम्यान दोन्ही संघांचे गुण ३ आहेत. नेट रनरेटच्या आधारे दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानी तर इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.

भारताचा सेमी फायनलमध्ये प्रवेश

ग्रुप बी मधून कोणते संघ सेमी फायनलमध्ये जाणार, हे चित्र अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र ग्रुप ए मधून सेमी फायनलमध्ये जाणारे दोन्ही संघ ठरले आहेत. या ग्रुप मधून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

Politics: आणखी एका पक्षात फूट; 12 आमदारांपैकी 8 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT