steve bucknor admits wrong decision against sachin tendulkar saam tv
Sports

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त निर्णय; सचिन तेंडुलकरला बाद ठरवून चूक केली, अंपायर स्टीव्ह बकनरला २२ वर्षांनी पश्चाताप

Sachin Tendulkar Out wrong decision : सचिन तेंडुलकर याला बाद ठरवण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली वादग्रस्त अंपायर स्टिव्ह बकनरनं २२ वर्षांनी दिली आहे.

Nandkumar Joshi

Steve Bucknor - Sachin Tendulkar : क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त ठरलेल्या निर्णयावर अखेर २२ वर्षांनी पडदा पडला आहे. जगातील महान क्रिकेटपटू आणि विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला बाद ठरवल्याचा निर्णय चुकीचा होता अशी कबुली वेस्ट इंडीजचे माजी पंच (अंपायर) स्टिव्ह बकनर यांनी दिली आहे. यामुळं कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

सन २००३-०४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौरा होता. ब्रिस्बेन कसोटीत हा वादग्रस्त निर्णय देण्यात आला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर जबरदस्त फॉर्मात होता. यशाच्या शिखरावर होता असं म्हणायला हरकत नाही. ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा तेजतर्रार गोलंदाज जेसन गिलेस्पी यानं फेकलेला चेंडू सचिन तेंडुलकरच्या पॅडवर लागला. त्यावर जोरदार अपील करण्यात आली. अनुभवी अंपायर बकनरनं सचिनला पायचीत (LBW) ठरवलं.

बकनर यांच्या एका निर्णयानं अख्ख्या सामन्याचा निकाल बदलला होता. त्यावेळी प्रतिस्पर्धी गोलंदाजांना फोडून काढणारा सचिन अवघ्या तीन धावांवर बाद झाला होता. सचिनच्या पॅडवर लागलेल्या चेंडू स्टम्पच्या वरून निघून जात होता, असं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. या निकालानंतर अंपायर बकनर चाहत्यांच्या निशाण्यावर आले होते. प्रचंड नाराजी आणि टीका झाली होती. कमेंटेटर टोनी ग्रेग यांनी लाइव्ह कॉमेंट्रीमध्ये तर बकनर यांचा हा भयंकर निर्णय असल्याची टीका केली होती.

२२ वर्षांनी चुकीची कबुली

७९ वर्षीय बकनर यांनी नुकतीच वेस्ट इंडीज क्रिकेट अंपायर्स असोसिएशनला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी सचिन तेंडुलकरला बाद देण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी कबुली दिली. सचिन तेंडुलकरला पायचीत बाद ठरवणं ही चूक होती. आजही त्या निर्णयावर लोक बोलतात. आयुष्यात अनेक चुका होतात, असे सांगताना त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली. बकनर यांच्या या कुबलीनाम्यानं भारतीय क्रिकेट संघ आणि सचिनच्या चाहत्यांच्या मनातील कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.

बकनर वादग्रस्त अंपायर, अनेकदा चुकीचे निर्णय

बकनर यांनी सचिनला अनेकदा चुकीच्या पद्धतीने बाद ठरवलं आहे. त्यामुळं बकनर हे भारतीय चाहत्यांच्या नजरेत वादग्रस्त पंच म्हणूनच ओळखले जायचे. भारत-पाकिस्तान सामन्यातही असाच प्रकार घडला होता. अब्दुल रज्जाकनं फेकलेला चेंडू सचिनच्या बॅटला लागला देखील नव्हता. पण अपील करण्यात आली आणि बकनर यांनी त्याला बाद ठरवलं. सचिननंही गेल्या वर्षी 'आस्क मी एनिथिंग' या शोमध्येही या घटनेचा उल्लेख केला होता. बकनर यांच्या या निर्णयावर विचारणा केली असता, सचिननं मिश्किल टिप्पणी केली होती. मी फलंदाजी करत असताना, बोट वर करू नये यासाठी बकनर यांना बॉक्सिंग ग्लोव्ह्ज द्यायला हवे होते, असे सचिन हसत-हसत म्हणाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : रोज सकाळी करा 'हा' नाश्ता, वजन होईल कमी अन् पोटाची ढेरी गायब

khatron ke khiladi 15: अ‍ॅडव्हेंचरचा नवा सीझन; 'खतरों के खिलाडी १५' मध्ये 'या' १२ सेलिब्रिटींची एन्ट्री

अविवाहित तरुणींना लग्नाचे प्रस्ताव येतील, खिशात पैसा टिकून राहील; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार होणार

Pune Crime: पुणे हादरले! सासऱ्याकडून सुनेची हत्या, ६ महिन्यांच्या बाळासमोर डोक्यात दगड घातला

नाना पटोलेंवर नोटांचा वर्षाव; व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, video

SCROLL FOR NEXT