stephen curry 
Sports

Stephen Curry : एनबीए त 3 पॉइंटर्सचा विक्रम स्थापित (पहा Video)

करी हा लीगचा सर्वात उत्कृष्ट शूटर मानला जातो. 3- पॉइंटर्ससाठी पहिल्या तीन पैकी दोन सीझन त्याच्या नावावर आहेत. 400 थ्री पाॅईंटर्ससह एकमेव सीझनसह.

वृत्तसंस्था

न्यू यॉर्क : बास्केटबाॅल (baskeltball) जगतात सर्वांना आपल्या थ्री पाॅईंटर्सच्या काैशल्याने प्रेमात पाडणा-या गोल्डन स्टेट वॉरियर्सच्या (golden state warriors) स्टीफन करी (stephen curry) याने NBA (नॅशनल बास्केटबाॅल असाेसिएशन) मध्येत 3 pointers चा नवा विक्रम स्थापित केला आहे. न्यू यॉर्क निक्स (new york knicks) विरुद्ध गोल्डन स्टेट वॉरियर्सच्या सामन्यातील पहिल्या सत्रातच स्टाफीनने 3 पॉइंटर मारुन रे ऍलनचा विक्रम मोडला. स्टाफीनच्या नावावर आता २९७४ थ्री पाॅईंटरची नाेंद झाली आहे. golden state warriors stephen curry breaks nba career 3 point record

सामन्याच्या पहिल्या सत्रात ७ मिनीट ३३ शिल्लक असताना करीने उजव्या बाजूने बास्केटच्या दिशेने चेंडू फेकत हळूहळू स्वतःच्या कोर्टच्या दिशेने (backward) मागे गेला. त्याच्या थ्री पाॅईंटरची नाेंद हाेताच मैदानात उपस्थित असलेल्यांसह प्रेक्षकांनी टाळ्याच्या कडकडाट केली. स्टीफनच्या या विक्रमाचे सेलिब्रेशन करण्यासाठी वॉरियर्सने फाऊल करुन त्वरीत टाइमआउट कॉल केला. त्यानंतर सर्व खेळाडूंनी (players) त्याचे काैतुक केले.

यावेळी करीचे वडील डेल हे बेसलाइनवर बसले होते. तेथे जात करीने त्यांना मिठी मारली. तसेच डेव्हिडसन येथील त्याचे प्रशिक्षक बॉब मॅककिलोप स्टँडवर लॅरी रिले यांच्या बरोबरीने उभे होते ज्यांनी वॉरियर्ससाठी करीचा मसुदा तयार केला होता. त्यानंतर वॉरियर्सचा संघातील सहकारी ड्रायमंड ग्रीनला मिठी मारली. अखेरी करीने अॅलन रायनला कडकडून मिठी मारताच रायनने त्याचे अभिनंदन केले.

करीने हा विक्रम मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे नाेंदविला. 27 फेब्रुवारी 2013 मध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीच्या हायलाइट्सपैकी एक विक्रम येथे त्याच्यावर नाेंदविला गेला होता. त्याने ११ पॉइंटर्ससह ५४ गुण नाेंदविले हाेते. बास्केटबाॅल जगतात सर्वात लोकप्रिय स्टार बनताना त्याने दोन MVP पुरस्कार आणि तीन चॅम्पियनशिप जिंकल्या आहेत. 33 वर्षीय करीने आत्तापर्यंत 789 व्या गेममध्ये सर्वाेत्तम कारकिर्द घडवली आहे.

"मला वाटते की चाहते फक्त त्याच्या नम्रतेमुळे आणि त्याच्या कठोर परिश्रमावर खूष असतात. त्यामुळे ते त्याच्याकडे आकर्षित झाले आहेत असे गोल्डन स्टेटचे प्रशिक्षक स्टीव्ह केर यांनी करीबद्दल भावना व्यक्त केली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT