star pakistani pacer shaheen shah afridi married again with shahid afridi daughter ansha before world cup 2023  twitter
Sports

Shaheen Afridi Marriage: आफ्रिदी दुसऱ्यांदा अडकला विवाह बंधनात! विवाह सोहळ्यातील फोटो व्हायरल

Shaheen Afridi Marriage Photos: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे.

Ankush Dhavre

Shaheen Afridi Marriage Photos:

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकला आहे. त्याने पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीद आफ्रिदीच्या मुलीसोबत विवाह केला आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात त्याने अंशासोबत विवाह केला होता.

मात्र त्यावेळी कुटुंबातील सदस्य आणि मोजकीच मंडळी उपस्थित होती. यावेळी अनेक स्टार क्रिकेटपटूंनी त्याच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली आहे.

शाहीन आफ्रिदीच्या विवाह सोहळ्याला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने देखील हजेरी लावली. त्याने शाहीन आफ्रिदीला मीठी मारत आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आशिया चषक २०२३ स्पर्धा सुरु असतानाच शाहीन आफ्रिदीच्या विवाहाची तारीख जाहीर करण्यात आली होती. १९ सप्टेंबर विवाह तर २१ सप्टेंबर रोजी रिसेप्शन होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात अडकला होता विवाह बंधनात..

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात शाहिन आफ्रिदी आणि अंशा विवाह बंधनात अडकले होते. मात्र या सोहळ्याला जास्त लोकं उपस्थित राहु शकले नव्हते. मात्र यावेळी त्याने ग्रँड पार्टी दिली आहे. ज्यात अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहिल्याचं दिसून आलं आहे. (Latest sports updates)

पाकिस्तानला आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ फेरीतून बाहेर पडावं लागलं होतं. भारतीय संघाच्या पराभवानंतर अशा बातम्या आल्या होत्या की, शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझम यांच्यात ड्रेसिंग रुममध्ये बाचाबाची झाली.

मात्र आता बाबर आझमने शाहीन आफ्रिदीला मीठी मारली आणि शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यावरून असं दिसून येतंय की,या दोघांबद्दल ज्या चर्चा सुरू होत्या त्या केवळ अफवा होत्या.

शाहीन आफ्रिदी आगामी वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधीत्व करताना दिसून येणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाची धुरा शाहीन आफ्रिदीकडे असणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rush Driving: रस्त्यावर वाहन चालवताना 'या' चुका केल्या तर नाही मिळणार विमा: सुप्रीम कोर्ट

Shocking: वॉशरूमध्ये लपून महिला सहकाऱ्यांचे VIDEO काढायचा, इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक

Nails Cutting Tips: नखं कापण्यासाठी योग्य दिवस कोणता?

कन्नड नगरपरिषदेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना; थरारक VIDEO

Nashik News: देव्हाऱ्याखाली दारूचा साठा सापडला, दृश्य बघून पोलिसही चक्रावले | VIDEO

SCROLL FOR NEXT