team india  saam tv
Sports

Jasprit Bumrah,Asia Cup 2023: टीम इंडियाला मोठा धक्का! आशिया चषक अर्ध्यात सोडून स्टार खेळाडू परतला मायदेशी

Jasprit Bumrah News In Marathi: भारतीय संघाचा स्टार खेळाडू मायदेशी परतला आहे.

Ankush Dhavre

Jasprit Bumrah,Asia Cup 2023:

श्रीलंकेत आशिया चषक २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने होते. हा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नव्हता. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला गेला आहे. दरम्यान नेपाळ विरूद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह मायदेशी परतला आहे.

दैनिक जागरणच्या वृत्तानुसार जसप्रीत बुमराह मुंबईत परतला आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आशिया चषक सुरू असताना त्याचं भारतात परतणं ही भारतीय संघासाठी आणि रोहित शर्मासाठी चिंतेची बाब आहे.

भारतीय संघाला मोठा धक्का..

आशिया चषकातील तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये रंगला. या सामन्यात जसप्रीत बुमराहला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. मात्र पावसामुळे दुसरा डाव रद्द झाल्याने त्याला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. आता भारतीय संघाचा पुढील सामना येत्या सोमवारी रंगणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळताना दिसून येणार नाही. (Latest sports updates)

आयर्लंडविरुद्ध केलं कमबॅक..

गेले काही महिने दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहने आयर्लंड विरूद्धच्या टी -२० मालिकेतून कमबॅक केले होते. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. हा मालिकेत त्याची मालिकावीर म्हणून निवड देखील करण्यात आली होती. आता जसप्रीत बुमराह मायदेशी परतल्याने क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving School: ड्रायव्हिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम शाळा कशी निवडावी? अर्ज करण्याचे स्टेप-बाय-स्टेप टिप्स

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

Amruta Khanvilkar: अमृताच्या सौंदर्याने केलाय कहर; PHOTO पाहा

मुंबईत पावसाचं रौद्ररूप! दादरमध्ये शाळकरी विद्यार्थी पुराच्या पाण्यात अडकले; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

SCROLL FOR NEXT