IND vs PAK, Asia Cup 2023: रोहित- कोहलीला बाद करण्यासाठी काय होता आफ्रिदीचा मास्टरप्लान? स्वतःच केला खुलासा

Shaheen Afridi Statement: भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठी काय होता शाहिन आफ्रिदीचा मास्टरप्लान?
Shaheen Afridi On Rohit Sharma Virat Kohli Wicket
Shaheen Afridi On Rohit Sharma Virat Kohli Wicketsaam tv
Published On

Shaheen Afridi On Rohit Sharma Virat Kohli Wicket:

श्रीलंकेच्या कँडीमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने २६६ धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे दुसरा डाव सुरू होऊ शकला नाही.

या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली. दरम्यान पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर भारतीय संघाला चितपट करण्यासाठी काय प्लान केला होता याचा खुलासा शाहिन शाह आफ्रिदीने केला आहे.

Shaheen Afridi On Rohit Sharma Virat Kohli Wicket
India vs Pakistan Memes: 'शेजारऱ्यांचे TV वाचले..', भारत- पाकिस्तान सामन्यानंतर भन्नाट मीम्स व्हायरल

पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर शाहिन आफ्रिदीने बोलताना म्हटले की, 'नवीन चेंडूने गोलंदाजी करताना आमचा हाच प्लान होता.मला असं वाटतं की, विराट आणि रोहितला बाद करणं आमच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं. माझ्यासाठी सर्वच फलंदाज सारखे आहेत. रोहितची विकेट माझ्यासाठी खास होती. आमच्या वेगवान गोलंदाजांनी जो प्लान केला होता तो यशस्वी ठरला. नसीम ताशी १५० च्या गतीने गोलंदाजी करत होता. हे पाहून मला खरंच आनंद झाला. नवीन चेंडू स्वींग होतो. मात्र चेंडू जेव्हा जुना होतो तेव्हा धावा करणं अधिक सोपं होऊन जातं.' (Latest sports updates)

Shaheen Afridi On Rohit Sharma Virat Kohli Wicket
Virat Kohli Female Fan Viral Video: शेजाऱ्यांवर प्रेम करणं चुकीचं नाही... तरुणीचं विराट प्रेम पाहून पाकिस्तानी फॅन्सचा तिळपापड

पाकिस्तान संघाकडून शाहिन आफ्रिदी, हारिस रउफ आणि नसीम शाहने अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरचं कंबरडं मोडलं. विराट कोहली ४, रोहित शर्मा ११, शुबमन गिल १० तर श्रेयस अय्यर १४ धावा करत माघारी परतला.

भारतीय संघातील टॉप ऑर्डरचे फलंदाज फ्लॉप ठरल्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने भारतीय संघाला दमदार कमबॅक करून दिले. भारतीय संघाकडून हार्दिक पंड्याने ९० चेंडूचा सामना करत ८७ धावांची खेळी केली.

तर ईशान किशन ८२ धावा करत माघारी परतला. या डावात भारतीय संघाने २६६ धावा करत पाकिस्तानला विजयासाठी २६७ धावांचे आव्हान दिले होते. मात्र दुसऱ्या डावात पावसाने हजेरी लावल्याने हा सामना रद्द करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com