tushar deshpande saam tv news
Sports

Tushar Deshpande Marriage: सीएसकेचा शिलेदार विवाहबंधनात! कल्याणमध्ये गर्लफ्रेंडसोबत अडकला लग्नाच्या बेडीत

Tushar Deshpande Marriage News In Marathi: चेन्नई सुपर किंग्ज संघाला चॅम्पियन बनवणारा गोलंदाज तुषार देशपांडे विवाह बंधनात अडकला आहे

Ankush Dhavre

>>अभिजीत देशमुख

CSK Bowler Tushar Deshpande Marriage:

चेन्नई सुपर किंग्ज संघाला चॅम्पियन बनवणारा गोलंदाज तुषार देशपांडे विवाह बंधनात अडकला आहे. कल्याणच्या एका हॉलमध्ये हा लग्न सोहळा संपन्न झाला . अनेक दिग्गज फलंदाजांची विकेट काढणाऱ्या तुषार देशपांडेला नभा गड्डमवारने क्लीन बोल्ड केलं आहे.

नभा गड्डमवार ही त्याची कॉलेजची मैत्रीण आहे. काही दिवसांपूर्वी दोघांचा साखरपुडा झाला होता. या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

तुषार देशपांडे हा आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व करतो. आयपीएल २०२३ स्पर्धेत चेन्नईचा संघ चॅम्पियन बनला होता.या हंगामात त्याने दमदार गोलंदाजी केली होती. यानंतर कॉलेजच्या गर्लफ्रेंडसोबत त्याचा साखरपुडा झाला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लग्नाची एकच चर्चा रंगली होती .

तुषार देशपांडे नभा या कॉलेजच्या गर्लफ्रेंड सोबत विवाह बंधनात अडकला आहे. या विवाह सोहळ्याला त्याचे क्रिकेटचे मार्गदर्शक मित्र आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहून वधू-वरांस शुभ आशीर्वाद दिले आहेत .आयपीएल आणि मुंबई संघाकडून एकत्र खेळणाऱ्या प्रशांत सोलंकी,शिवम दुबे,धवल कुलकर्णी, भावीन ठक्कर या स्टार क्रिकेटपटूंनी या लग्नाला हजेरी लावली होती. (Latest sports updates)

कोण आहे तुषार देशपांडेची होणारी लाईफ पार्टनर?

नाभा गद्दमवार असं तुषार देशपांडेच्या होणाऱ्या लाईफ पार्टनरचं नाव आहे. तुषारने साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत पोस्ट केली आहे.

यावेळी त्याने नाभा ही त्याची शाळेपासूनची क्रश होती आणि आता ती त्याची लाईफ पार्टनर बनली आहे, असं म्हटलंय.

आयपीएल २०२३ स्पर्धेत दमदार कामगिरी..

आयपीएल २०२३ स्पर्धेत तुषार देशपांडेने दमदार कामगिरी केली आहे. एमएस धोनीने दिलेली जबाबदारी त्याने योग्यरित्या पार पाडली आहे. त्याने या स्पर्धेतील १६ सामन्यांमध्ये २१ गडी बाद केले आहेत. यादरम्यान ४५ धावा करत ३ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : थंड हवा, धबधबे, हिरवीगार वनराई; भारतातील 'या' हिल स्टेशनची बातच न्यारी

Tuesday Horoscope : महालक्ष्मी प्रसन्न होणार, सासरवाडीकडून धनयोगाचा लाभ दिसतोय; ५ राशींच्या लोकांना सुख समृद्धी मिळणार

Dry Potato Bhaji: नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा स्वादिष्ट आणि चविष्ट बटाट्याची सुकी भाजी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: नाशिक मुंबई महामार्गावर रायगडनगर जवळ खाजगी बसला भीषण अपघात

Dhananjay Munde: 'ते विधान मागे घ्या' बंजारा समाज भर सभेत धनंजय मुंडेंवर भडकले|VIDEO

SCROLL FOR NEXT