Srilanka vs Pakistan asia cup 2022 final match saam tv
Sports

Asia Cup 2022 : श्रीलंकेचा 'राजा'पक्षा चमकला, पाकिस्तानसमोर १७१ धावांचं आव्हान

भानुका राजापक्षाने आक्रमक खेळी करत ४५ चेंडूत ७१ धावा कुटल्या.

नरेश शेंडे

दुबई : आशिया करंडक स्पर्धा २०२२ चा अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात सुरु आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेनं भारताचा पराभव करत आशिया स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी मैदानात कंबरी कसली. ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंकेला विजयी सूर गवसला नाही. परंतु, त्यानंतर श्रीलंकेच्या संघान चमकदार कामगिरी करत सुपर ४ मध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत मजल मारली आणि पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात प्रवेश केला. आजच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने २० षटकांत १७० धावा केल्या. विशेष म्हणजे श्रीलंकेचा स्टार खेळाडू भानुका राजापक्षाने आक्रमक खेळी करत ४५ चेंडूत नाबाद ७१ धावा कुटल्या.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहने पहिला धक्का दिला. श्रीलंकेची फक्त दोनच धावसंख्या झाली असताना कुसल मेंडीसचा शाहने त्रिफळा उडवला. मेंडिस शुन्यावर बाद झाल्यामुळे श्रीलंकेची पॉवर प्ले मध्ये खराब सुरुवात झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या हारिस रौऊफने चौथ्या षटकात पथूम निसंकाला अवघ्या ८ धावांवरच पव्हेलिनचा रस्ता दाखवला.

तर सहाव्या षटकात दनुष्का गुणतिलकाला त्रिफळाचीत केला. गुणतिलकालाने एकच धाव केल्याने श्रीलंकेला धावांची गती मंदावली. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. २१ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केल्यानंतर हारिस रौऊफने हसरंगाला बाद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey : मराठी भाषिकांना आपटून आपटून मारणार? भाजप खासदाराची धमकी, VIDEO

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट? राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका, VIDEO

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT