श्रीलंकेचे 3 निलंबित क्रिकेटपटू भारता सोबतच्या मालिकेपासूनही दूर  Twitter
Sports

श्रीलंकेचे 3 निलंबित क्रिकेटपटू भारता सोबतच्या मालिकेपासूनही दूर

श्रीलंकेचे 3 निलंबित क्रिकेटपटू मंगळवारी संध्याकाळी इंग्लंडहून मायदेशी परतले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रीलंकेचे 3 निलंबित क्रिकेटपटू मंगळवारी संध्याकाळी इंग्लंडहून (SL vs ENG) मायदेशी परतले आहेत. इंग्लंडमधील कोरोना प्रोटोकॅालच्या (Coronavirus) नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कुसल मेंडिस, दनुष्का गुणतिलाका आणि निरोशन डिकवेला यांना श्रीलंका क्रिकेटने (SCL) निलंबित केले होते. एसएलसीनेही जाहीर केले आहे की, भारता विरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी या तिघांना संघात स्थान देण्यात येणार नाही.

श्रीलंकेच्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानूसार, चौकशीच्या निकालावरुन त्यांना किमान एक वर्षासाठी बंदी आणि दंड ठोठावला जाऊ शकतो. आगमन झाल्यानंतर तिन्ही खेळाडूंना 14-दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विलगीकरणाचे दिवस पूर्ण झाल्यावर त्यांना रविवारी डरहॅममधील घटनेच्या तपासाला सामोरे जावे लागेल.

दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) सध्याच्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान बायो-बबलचे उल्लंघन केल्याबद्दल फलंदाज कुसल मेंडिस आणि यष्टीरक्षक निरोशन डिकवेला यांच्यासह तीन क्रिकेटपटूंना निलंबित केले होते आणि त्यांना त्वरित घरी परत जाण्याचे आदेश दिले होते. या दोघांव्यतिरिक्त तिसर्‍या टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाल्यानंतर सलामीवीर धनुष्का गुणतीलाका रात्री डरहॅमच्या रस्त्यावर फिरताना दिसला. या सामन्यात श्रीलंकेला 89 धावांनी दणदणीत पराभव पत्करावा लागला. तिन्ही खेळाडू या सामन्यात खेळले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tushar Apte : बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपचा स्वीकृत नगरसेवक

Shocking : "तुला पाळी आली असेल तर पुरावा दाखव", शिक्षिकेची अपमानास्पद वागणूक, विद्यार्थिनीचा मृत्यू; सरकारी कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

Pooja Sawant Mangalsutra: मराठमोळा साज! हे आहेत लेटेस्ट ट्रेडिंग लांब मंगळसूत्राचे पॅटर्न

Yuzvendra And Dhanashree: डिव्होर्सनंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा येणार एकत्र; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव, बहीण-भाऊ अन् बापाचा होरपळून मृत्यू, गाढ झोपेत असतानाच....

SCROLL FOR NEXT