Sri Lanka cricket saam tv
Sports

Sri Lanka cricket: श्रीलंकेत क्रिकेट कोचच्या हत्येने खळबळ; खेळाडूंसोबत भांडणानंतर नेमकं काय घडलं? क्रिकेटपटू अटकेत

श्रीलंकेत क्रिकेट कोच सुमित फर्नांडो यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. खेळाडूंसोबत पाण्यावरून झालेल्या वादानंतर मारहाणीचा आरोप असून 17 वर्षीय क्रिकेटपटूला अटक झाली आहे. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नसून पोलिस तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

श्रीलंकेत एक धक्कादायक घटना घडलीये. एका क्रिकेट कोचचा खेळाडूंसोबत झालेल्या वादानंतर मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कोलंबोमधील क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षण देणारे 62 वर्षीय सुमित फर्नांडो यांची 8 ऑगस्ट रोजी खेळाडूंसोबत पाण्यावरून वाद झाला होता. या वादानंतर त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

खेळाडूंसोबत नेमका काय वाद झाला?

सुमित फर्नांडो हे मोरतुवामध्ये प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेजचे माजी क्रिकेट कोच होते. त्यांनी श्रीलंकेचा वनडे कर्णधार कुसल मेंडिस याच्यासह अनेक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण दिलं होतं. 8 ऑगस्ट रोजी ते ब्लूमफिल्ड क्रिकेट अँड अ‍ॅथलेटिक क्लबमध्ये होते. त्यावेळी प्रशिक्षण घेणाऱ्या काही खेळाडूंना पाणी प्यायचं होतं. मात्र क्लबमधील नळाला पाणी येत नव्हतं. यावरून खेळाडू आणि फर्नांडो यांच्यात वाद सुरू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, वाद वाढल्यानंतर फर्नांडो यांनी कथितपणे एका खेळाडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 17 वर्षांच्या एका खेळाडूने त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत फर्नांडो जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

17 वर्षांचा क्रिकेटपटू अटकेत

या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी 17 वर्षांच्या एका क्रिकेटपटूला अटक केलीये. 11 ऑगस्ट रोजी त्याला कोलंबो मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर 17 ऑगस्टपर्यंत त्याला बाल देखभाल सेवा विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

मृत्यूचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे. फर्नांडो यांना याआधीपासूनच हार्टचा आजार होता अशी माहिती त्यांच्या वैद्यकीय नोंदींमधून समोर आलीये. अधिकाऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाची तपासणी केली असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागचं नेमकं कारण काय होतं हे तपास अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

उद्यापासून भारत विरूद्ध श्रीलंकेच्या सिरीजला सुरुवात

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टेस्ट सिरीजला सुरुवात होण्याच्या काही दिवस आधी ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडालीये. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली टेस्ट 15 ऑगस्टपासून गॉल मध्ये खेळवली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hypertension: वयाच्या 30व्या वर्षीही होतो हाय BPचा त्रास; लक्षणं दिसत नसली तरी 'इतक्या' वेळा तपासा रक्तदाब

Bed Vastu Tips: बेडखाली चुकूनही 'या' 5 वस्तू ठेवू नका; अशुभ मानलं जातं

Bigg Boss 20 : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस'च्या घराचा नवा कॅप्टन बनला 'हा' सदस्य, चाहत्यांना धक्का

Maharashtra News Live Update : विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक लेझीम नृत्यावर फिरकल्या भाजप नेत्या डॉ हीना गावित....

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायत; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर घणाघात

SCROLL FOR NEXT