Sri Lanka’s Pathum Nissanka celebrates his historic century against Australia cricket team during the T20 World Cup 2026 clash in Pallekele. 
Sports

Sri Lanka vs Australia T20 WC: श्रीलंकेच्या धुरंधरांनी कांगारूंना रडवलं; वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियानं गाशा गुंडाळला

T20 World Cup 2026 Sri Lanka Beat Australia : विश्वचषकातील 'करा किंवा मरा अशी स्थिती असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झालाय. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना महत्त्वाचा होता.

Bharat Jadhav

  • श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत टी20 वर्ल्ड कप 2026 मधून बाहेर केले.

  • पथुम निसांका यांचे ऐतिहासिक शतक

  • श्रीलंकेची सुपर-8 फेरीत दमदार एन्ट्री

वर्ल्ड कपमधील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेतून बाहेर गेलाय. पल्लेकेले येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेने १० विकेट्सनी विजय मिळवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवलं. लंकेच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया टी२० विश्वचषकातून बाहेर गेला.दुसरीकडे ग्रुप बी मधून सुपर ८ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी झिम्बाब्वेला आता फक्त एका विजयाची गरज आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयापूर्वी झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

वर्ल्ड कपमधील जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा ऑस्ट्रेलियन संघ स्पर्धेतून बाहेर गेलाय. पल्लेकेले येथे झालेल्या सामन्यात श्रीलंकेने १० विकेट्सनी विजय मिळवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवलं. लंकेच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया टी२० विश्वचषकातून बाहेर गेला.दुसरीकडे ग्रुप बी मधून सुपर ८ मध्ये स्थान निश्चित करण्यासाठी झिम्बाब्वेला आता फक्त एका विजयाची गरज आहे. श्रीलंकेविरुद्धच्या विजयापूर्वी झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेच्या प्रभावी विजयाचा नायक पथुम निस्सांका ठरला. उजव्या हाताच्या सलामीवीराने फक्त ५२ चेंडूत १०० धावांची दमदार खेळी केली. यासह, पथुम निस्सांका २०२६ च्या टी२० विश्वचषकातील पहिला शतकवीर ठरला. ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर, श्रीलंका सुपर ८ टप्प्यात पोहोचणारा पाचवा संघ बनलाय. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंडने आधीच त्यांचे स्थान निश्चित केले होते.

निस्सांका आणि मेंडिसची ९७ धावांची भागीदारी

श्रीलंकेच्या विजयात पथुम निस्सांका आणि कुसल मेंडिस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६६ चेंडूत ९७ धावांची भागीदारी केली आणि सामना जिंकवला. मेंडिस ५१ धावांवर बाद झाला, पण निस्सांकाने शेवटपर्यंत कांगारू गोलंदाजांची धुलाई केली. यासह पवन रत्नायकेनेही १५ चेंडूत २८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT