SRH vs RR Qualifier 2  
Sports

SRH vs RR, Toss Prediction: 'टॉस ठरेल बॉस', हैदराबादला हरवण्यासाठी राजस्थानने आधी काय करावं?

SRH vs RR Qualifier 2, Toss Prediction: राजस्थान रॉयल्सला जर हा सामना जिंकायचा असेल, तर नाणेफेक जिंकून आधी काय करावं लागेल? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्य या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. दरम्यान क्वालिफायरचा सामना जिंकण्यासाठी चेन्नईच्या खेळपट्टीवर आधी गोलंदाजी करावी की गोलंदाजी? जाणून घ्या.

चेपॉकची खेळपट्टी ही स्लो असते. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना चांगलाच फायदा होतो. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणं अनेकदा फायदेशीर ठरतं. कारण सामना जसजसा पुढे जातो तशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल होत जाते. या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या १६४ इतकी आहे.

मात्र आयपीएल २०२४ स्पर्धेत उलट चित्र पाहायला मिळालं आहे. कारण या हंगामात अनेकदा २०० पेक्षा अधिक धावा केल्या गेल्या आहेत. गेल्या १० सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर ७ संघांनी धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला आहे.

कसा राहिलाय रेकॉर्ड?

चेपॉकच्या मैदानावर आयपीएल स्पर्धेतील ८३ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४८ सामने जिंकले आहेत. तर धावांचा बचाव करताना ३५ सामने जिंकले आहेत. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये २४६ धावा ही या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या आहे. तर १६४ धावा ही सरासरी धावसंख्या आहे.

सनरायझर्स हैदराबादचा चेपॉकच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर या संघाने १० सामने खेळले आहेत. यादरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाला ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर राजस्थान रॉयल्सचा चेपॉकच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर या संघाने ९ पैकी केवळ २ सामने जिंकले आहेत. तर ९ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death : खोलीत पेस्ट कंट्रोल केला, दारं-खिडक्या बंद; ट्रेनी पोलिसाचा गुदमरून मृत्यू, दिवाळीत दुर्दैवी घटना

Maharashtra Live News Update: पुण्यात पी एम पी बस चालकाकडून मारहाण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Meghalaya Travel: पृथ्वीवरील स्वर्ग! वर्षभर पडतो पाऊस; हिरवळ, धबधबे आणि निसर्गसौंदर्याचे खजिना पाहून तुम्हीही व्हाल थक्क

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

SCROLL FOR NEXT