SRH VS RR Hightlights: आयपीएल २०२३ स्पर्धेतील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने जोरदार कामगिरी करत ७२ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्स संघाने या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी २०४ धावांची गरज होती. मात्र संघातील फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. हैदराबाद संघाकडून अब्दुल समदने शेवटी तुफान फटकेबाजी करत ३२ धावांची खेळी केली. तर मयांक अग्रवालने २७ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तर राजस्थान रॉयल्स संघाकडून गोलंदाजी करताना चहलने सर्वाधिक ४ तर बोल्टने २ गडी बाद केले.
राजस्थानने दिले होते २०३ धावांचे आव्हान..
पहिल्या चेंडूपासूनच राजस्थानच्या फलंदाजांनी हल्लाबोल करायला सुरुवात केली होती.
राजस्थान रॉयल्स संघाकडून ३ फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. सलामीला आलेल्या जयस्वालने ५४, जोस बटलरने ५४ आणि संजू सॅमसनने ५५ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)
अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
सनरायझर्स हैदराबाद:
मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, ग्लेन फिलिप्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), आदिल रशीद, टी नटराजन, उमरान मलिक, फजलहक फारुकी
राजस्थान रॉयल्स :
यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक आणि कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.