SRH vs RR IPL 2024 Qualifier 2 saam tv
Sports

SRH vs RR, Qualifier 2: या ३ चुका राजस्थान रॉयल्सला भारी पडल्या! वाचा पराभवाची प्रमुख कारणं

Reasons Behind Rajasthan Royals Defeat: राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान काय आहे पराभवाचं नेमकं कारण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाने दमदार सुरुवात केली होती. मात्र स्पर्धेचा शेवट होता होता, या संघाच्या कामगिरीचा आलेख झपाट्याने खाली आला. सुरुवातीचे ८ सामने जिंकल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र शेवटच्या सामन्यांमध्ये हा संघ चांगली कामगिरी करू शकलेला नाही.

एलिमिनेटरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला धूळ चारत या संघाने क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला. मात्र या सामन्यात या संघाला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. काय आहेत राजस्थान रॉयल्सच्या पराभवाची प्रमुख कारणं ? जाणून घ्या. (Reasons Behind Rajasthan royals defeat)

फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना फ्लॉप फलंदाजी

हैदराबादच्या फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना राजस्थानचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप दिसून आले. चेपॉकच्या खेळपट्टीवर हैदराबाद संघाने आपल्या फिरकी गोलंदाजांचा योग्यवेळी वापर केला. हैदराबादकडून शाहबाझ अहमदने ३ प्रमुख फलंदाजांना बाद केलं. त्याने रियन पराग, आर अश्विन आणि यशस्वी जयस्वालला बाद करत माघारी धाडलं. अश्विनला तर त्याने शून्यावर माघारी धाडलं. अभिषेक शर्मानेही गोलंदाजीत बहुमूल्य योगदान दिलं. त्याने ४ षटक गोलंदाजी करत २४ धावा खर्च केल्या आणि २ गडी बाद केले.

राजस्थानची सुरुवात

फ्लॉप फलंदाजी हे राजस्थान रॉयल्स संघाच्या पराभवाचं प्रमुख कारण आहे. या संघाकडून टॉम कोहलेर आणि यशस्वी जयस्वाल हे दोघेही डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आले होते. महत्वाच्या सामन्यात कोहलेर अवघ्या १० धावा करत तंबूत परतला. तर संजू सॅमसन ३ आणि यशस्वी जयस्वाल ४२ धावा करत माघारी परतला.

मध्यक्रमातील फलंदाज ठरले फ्लॉप

राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली. त्यानंतर मध्यक्रमातील फलंदाजांवर डाव सांभाळण्याची जबाबदारी होती. मात्र तेही पूर्णपणे फ्लॉप ठरले. हैदराबादने मोक्याच्या क्षणी फिरकी गोलंदाजांचा वापर केला आणि त्यांनी विकेट्सही काढून दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेची शाळांची दयनीय अवस्था

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT