srh vs pbks head to head record sunrisers hyderabad vs punjab kings ipl 2024 amd2000 twitter
क्रीडा

SRH vs PBKS: पंजाब की हैदराबाद; कोण मारणार बाजी? कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. हे या हंगामातील डबल हेडरचे शेवटचे सामने असणार आहे. पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ पंजाब किंग्ज संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.

पंजाब किंग्जचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आधी शिखर धवन मग सॅम करनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाला १३ पैकी केवळ ५ सामने जिंकण्यात यश आलं. या सामन्याच्या निकालाचा पंजाब किंग्ज संघाला कुठलाही फरक पडणार नाही. मात्र फॅन्सला अभिवादन करण्यासाठी पंजाबचा संघ हा सामना जिंकण्यासाठी जोर लावताना दिसून येऊ शकतो. गेल्या ५ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय नोंदवला आहे.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ २२ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान सनरायझर्स हैदराबादने १५ सामने जिंकले आहेत. तर पंजाब किंग्ज संघाला केवळ ७ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. यादरम्यान पंजाबिरुद्ध खेळताना २१२ धावा ही सनरायझर्स हैदराबादची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर पंजाबची सर्वोच्च धावसंख्या २११ इतकी राहिली आहे.

कोण मारणार बाजी?

सनरायझर्स हैदराबादचा संघ सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मुख्य बाब म्हणजे हा संघ आज आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचं पारडं जड असणार आहे. तर याच मैदानावर खेळताना पंजाबचा रेकॉर्ड फार चांगला राहिलेला नाही. त्यामुळे हा सामना हैदराबादचा संध जिंकण्याची चिन्ह आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT