ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चॉकलेटमध्ये बुडवलेल्या स्ट्रॉबेरी हा सध्या खूप लंडन फेमस ट्रेंडिंग डेझर्ट आहे. दिसायला सुंदर, बनवायला सोपा आणि चवीला अप्रतिम असा आहे.
ताज्या स्ट्रॉबेरी , डार्क किंवा मिल्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट हवे असल्यास, बटर किंवा फ्रेश क्रीम, चॉकलेट चिप्स सजावटीसाठी इ. साहित्य लागते.
स्ट्रॉबेरी नीट धुवा आणि पूर्णपणे कोरड्या करुन घ्या.ओलसर स्ट्रॉबेरीवर चॉकलेट नीट चिकटत नाही. स्ट्रॉबेरीचे बारिक तुकडे करुन घ्या.
डबल बॉयलर पद्धतीने डार्क चॉकलेट आणि क्रीम हळूवार वितळवा. चॉकलेट गुळगुळीत होईपर्यंत ढवळत राहा.
ग्लासमध्ये आधी वितळवलेले चॉकलेट टाका. मग स्ट्रॉबेरी टाका आणि प्रत्येक स्ट्रॉबेरी चॉकलेटमध्ये बुडवून बाहेर काढा. अतिरिक्त चॉकलेट झाल्यास थोडेसे चॉकलेट काढून टाका.
संपूर्ण ग्लास तयार झाल्यावर ओल्या चॉकलेटवर लगेच स्प्रिंकल्स, चॉकलेट चिप्स किंवा व्हाइट चॉकलेट ड्रिझल करा.
आता 15 ते 20 मिनिटे डेसर्ट फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून चॉकलेट नीट सेट होईल.
स्ट्रॉबेरी चॉकलेट डेझर्ट तयार आहे. तुम्ही रोमॅंटिक डिनर किंवा बर्थ डे पार्टीसाठी बनवू शकता. या डेझर्टमुळे पार्टीला रीच लूक येतो.