ind vs nz sam tv
Sports

IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामने टीव्हीवर दिसणार नाही? मग कुठे पाहता येतील?

हार्दिक पांड्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. यानंतर वनडेची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील T20I मालिकेला शुक्रवारपासून वेलिंग्टन येथील स्काय स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. टी 20 नंतर एकदिवसीय मालिका देखील खेळवली जाईल. BCCI ने न्यूझीलंड दौऱ्यासाठी T20 विश्वचषक 2022 संघातील बहुतांश खेळाडूंना विश्रांती दिली आहे.

स्टार फलंदाज विराट कोहली, अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक यांच्यासह कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुल या मालिकेला दिसणार नाहीत. हार्दिक पांड्या  (Hardik Pandya)  तीन सामन्यांच्या T20I मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. यानंतर वनडेची जबाबदारी शिखर धवनकडे सोपवण्यात आली आहे. (Cricket News)

भारत-न्यूझीलंड T20 आणि ODI मालिकेचे वेळापत्रक

>> पहिली T20: 18 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता

>> दुसरी T20: 20 नोव्हेंबर 2022, दुपारी 12 वाजता

>> तिसरी टी-20: 22 नोव्हेंबर 202, दुपारी 12 वाजता

>> पहिला एकदिवसीय सामना : 25 नोव्हेंबर 2022, सकाळी 7

>> दुसरा एकदिवसीय सामना : 27 नोव्हेंबर 2022, सकाळी 7

>> तिसरा एकदिवसीय : 30 नोव्हेंबर 2022, सकाळी 7 वाजता (Latest Marathi News)

भारत-न्यूझीलंड सामने कुठे बघता येतील?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळली जाणारी ही टी-20 आणि एकदिवसीय मालिका टीव्हीवर दाखवली जाणार नाही. क्रिकेट चाहत्यांसाठी त्यामुळे अडचण होऊ शकते. ही मालिका अॅमेझॉन प्राइमच्या अॅप आणि वेबसाइटवर प्रसारित केली जाईल. सोनी टीव्ही किंवा स्टार स्पोर्ट्सकडे त्याचे प्रसारण करण्याचे अधिकार नाहीत. डीडी स्पोर्ट्सवर हे सामने प्रसारित केले जाऊ शकतात.

टी-20 मालिकेसाठी टीम इंडिया - हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया - शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urmila Kanetkar: ती परी असमानीची....; निसर्गरम्य वातावरण आणि उर्मिलाच्या मनमोहक अदा

Maratha Reservation: दोन सप्टेंबरचा GR हा फक्त मराठवाड्यापुरताच; मराठा आरक्षणावर बावनकुळेंचा मोठा खुलासा

Maharashtra Live News Update: कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ आपचं धूळफेक आंदोलन

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

SCROLL FOR NEXT