IND vs AUS 3rd Test Updates Saam TV
क्रीडा

Sport News : तिसऱ्या कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; वॉर्नरपाठोपाठ आणखी एक खेळाडू मालिकेबाहेर

स्ट्रेलियन संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Satish Daud

IND vs AUS 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना १ डाव आणि तब्बल १३२ धावांनी आपल्या खिशात घातल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा ४ गड्यांनी पराभव केला. सलग दोन विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत मोठी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमध्ये तिसरा सामना लवकरच सुरू होणार आहे. मात्र, त्याआधी ऑस्ट्रेलियन संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. (Latest Sports Updates)

भारताकडून (Team India) झालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाला एकामागून एक धक्के बसायला लागले आहेत. दुसरा कसोटी सामना सुरु असताना डेव्हिड वॉर्नरला दुखापत झाली होती. वॉर्नरनंतर आता ऑस्ट्रेलियाच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण, ऑस्ट्रेलियाचा एक मॅचविनर खेळाडू आता मालिकेबाहेर गेल्याचे समोर आले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या दारूण पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा मायदेशी निघून गेला आहे. त्यानंतर अजून एक ऑस्ट्रेलियासाठी वाईट बातमी आली आहे, कारण आता ऑस्ट्रेलियाचा मॅचविनर खेळाडू जोश हेझलवूड आता या मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. (Latest Marathi News)

दुखापतीमुळे जोश हा पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. तो आता यापुढील सामन्यांमध्ये खेळेल, अशी चाहत्यांना आशा होती. पण आता जोश या संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही. जोशला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दुखापत झाली होती. त्यानंतर आता तो या मालिकेतही खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने भारतासाठी बॉर्डर गावस्कर मालिका अत्यंत महत्वाची होती. भारताने चांगला खेळ करून आपण फायनलमध्ये पोहचण्याचे खरे दावेदार आहोत हे दाखवून दिलंय. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

दुसरीकडे, पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला  (India vs Australia) आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थान गमवावे लागले आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा संघ आता ही मालिकाही जिंकू शकणार नाही. कारण आता या मालिकेत दोन सामने राहिले आहेत आणि हे दोन्ही सामने जरी त्यांनी जिंकले तरी ही मालिका बरोबरीत सुटू शकते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबल स्थिती

- ऑस्ट्रेलिया, विजयाची टक्केवारी - ६६.६७%

- भारत, विजयाची टक्केवारी - ६४.०६%

- श्रीलंका, विजयाची टक्केवारी - ५५.३३%

- दक्षिण आफ्रिका, विजयाची टक्केवारी - ४८.७२%

- इंग्लंड, विजयाची टक्केवारी -४६.९७%

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: माहिममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर; ठाकरे गटाचे महेश सावंत आघाडीवर

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

Protein Bar: प्रोटीन बार तुमच्या शरीरासाठी चांगले आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Maharashtra Election Result : राज्यातील पहिला अधिकृत निकाल, भाजपच्या उमेदवाराचा दणदणीत विजय

Wayanad By Election Result 2024: भावाचा गड राखणार; प्रियंका गांधी २ लाख ३५ हजार मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT