Keshav Maharaj Saam TV
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज म्हणतो 'जय श्रिराम'; पोस्ट व्हायरल

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोसोबत केशव महाराजाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काय भारी सिरीज झालेली आहे.

वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेने (Sauth Africa) एकदिवसीय मालिकेत भारताचा 3-0 असा पराभव केला आहे. कसोटी मालिका गमावल्यानंतर भारताला वनडे मालिकेतही पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू खूप उत्साहित दिसत आहेत. यजमान संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजने (Keshav Maharaj Instagram Post) सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केली आहे, जी चांगलीच व्हायरल झाली आहे. महाराजने या पोस्टमध्ये 'जय श्री राम' लिहिले आहे. विराट कोहलीला (Virat Kohli) खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवून महाराजा याने आपली योग्यता सिद्ध केली आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोसोबत केशव महाराजाने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'काय भारी सिरीज झालेली आहे. मला आमच्या संघाचा खूप अभिमान आहे. पुढच्या मालिकेसाठी तयारी करण्याची वेळ आली आहे. जय श्रिराम.' केशव महाराज दक्षिण आफ्रिकेत राहत असला तरी त्याचे भारतीय संस्कृतीबाबतचे प्रेम नेहमीच दिसत असते. तो मंदिरात जाऊन हनुमानाची पूजाही करतो.

एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीला दोनदा बाद केले

एकदिवसीय मालिकेत महाराजने चांगली गोलंदाजी केली आहे. त्यांने तीन सामन्यांत तीन बळी घेतले आहेत. मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात महाराजने भारताचा स्टार फलंदाज माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीला दोन्ही वेळा बाद केले. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात महाराजने कोहलीला खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. यानंतर केपटाऊनमधील तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय फलंदाज चागल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याने कोहलीला बाद केले.

केशव महाराज उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचा

केशव महाराज मुळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूरचा. केशवचे वडील आत्मानंद महाराज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांचे पूर्वज 1874 च्या सुमारास सुलतानपूरहून डरबनला स्थलांतरित झाले होते. त्यांचे कुटुंब डरबनमध्ये राहात असले तरी ते अजूनही भारताच्या संस्कृतीवर विश्वास ठेवतात आणि सर्व सण साजरे करतात, असे ते म्हणाले होते.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT