SA vs SL ICC World Cup 2023 Saam tv
क्रीडा

SA vs SL ICC World Cup 2023: आधी फलदांजांनी धुतलं, नंतर गोलदाजांनी लोळवलं; दक्षिण आफ्रिकेच्या शिलेदारांकडून लंका चारीमुंड्या चीत

Vishal Gangurde

South Africa vs Sri Lanka World Cup 2023:

विश्वचषकाचा चौथा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेदरम्यान झाला. आज झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी लंकेच्या गोलंदाजांची धुलाई करत ४०० पार धावांचा डोंगर उभारला. आफ्रिकेच्या फलंदाजांनी जबरदस्त फलंदाजी करत ४२९ धावांचं आव्हान लंकेला दिलं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना लंका ३२६ धावांवर गारद झाली. आफ्रिकेने हा सामना जिंकत अनेक विक्रम नावावर केले. (Latest Marathi News)

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी स्फोटक फलंदाजी करत ५० षटकात ५ गडी गमावून ४२८ धावा कुटल्या. यावेळी आफ्रिकेच्या डावात तिघांनी शतके ठोकली. तर एडनने सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम केला.

दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या लंकेची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या दुसऱ्या षटकात पथुम शून्य धावांवर बाद झाला. कुसल परेराही स्वस्तात माघारी परतला. मात्र, यानंतर मेंडिसने संघाचा डाव सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मेंडिसने ४२ चेंडूत ७६ धावा ठोकल्या.

कुसल मेंडिस बाद झाल्यानंतर आफ्रिकने लंकेवर दबाव आणला. मेंडिस बाद होताच लंकेचा धावसंख्येवर परिणाम झाला. मेंडिसनंतर मात्र असलंका आणि शनाका यांनी काही प्रमाणात डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, असलंकाही जास्त कमाल करू शकला नाही. असंलका ७९ धावांवर बाद झाला. तर कर्णधार दासून शनाका ६८ धावांवर बाद झाला.

तीनही दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर लंकेच्या विजयाच्या अपेक्षा भंग झाल्या. त्यानंतर संपूर्ण संघ ३२६ धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक, रासी वॅन डर डुसेन आणि एडेन मार्करस यांनी शतकी खेळी खेळल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT