Asian Games Kabaddi Controversy: एक मिनिटाची मॅच बाकी असताना भरमैदानातच हायवोल्टेज ड्रामा; कबड्डीच्या सामन्यात नेमकं काय घडलं?

Asian Games Kabaddi Controversy: शेवटच्या एका मिनिटाच्या सामन्यात कुणी कल्पनाही न करणारा थरार आणि बाचाबाची बघायला
Asian Games Kabaddi Controversy:
Asian Games Kabaddi Controversy:Saam tv
Published On

Asian Games Kabaddi Controversy:

एशियन्स गेम्सचा चौदावा दिवस भारतासाठी जितका ऐतिहासिक ठरला आहे. तितकाच वादग्रस्तही ठरला आहे. भारताच्या कबड्डी संघाने इराणला फायनलमध्ये धूळ चारली. त्यांचा 33-29 च्या फरकाने पराभव केला. त्यानंतर भारतीय संघ गोल्ड मेडलचा मानकरी ठरला. शेवटच्या एका मिनिटाच्या सामन्यात कुणी कल्पनाही न करणारा थरार आणि बाचाबाची बघायला मिळाली. (Latest Marathi News)

भारतीय कोच आणि इराणी कोच थेट पंचाशी भिडले..भारतीय प्लेयर्स जीवाची बाजी लावून लढले..इराणी प्लेयर्स हट्टाला पेटून उठले.. भर मैदानाच ठाण मांडून बसले..1 मिनिटचा बाकी असलेला सामना पूर्ण करायला तब्बल 1 तास लागला..

शेवटी पंचांच्या गहन चर्चेनंतर, दोन्ही संघांची समजूत काढून हा फायनलचा हायप्रेशर सामना भारताने जिंकला..पण भारत आणि इराणचे प्लेयर या सामन्यात एकमेंकाना का भिडले? एशियन गेम्सचा कबड्डीचा फायनल सामना का ठरला वादग्रस्त? यामागचं कारणही तितकंच इंटरेस्टिंग होतं.

Asian Games Kabaddi Controversy:
Aiden Markram Century: 'मार्करम' चा 'पराक्रम' श्रीलंकेविरुद्ध ठोकलं विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक

एशियन्स गेम्सची कबड्डीची फायनल चांगलीच चर्चेत आली आहे. याआधीच्या एशियन्स गेममध्ये इराणने भारतला फायनलमध्ये धूळ चारली होती. त्यामुळे भारत पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानेत मैदानात उतरला होता.

सामना रंगतदार होईल, अशी शक्यता होतीच. झालंही तसंच. दोन्ही संघ जीवाची बाजी लावून खेळत होते. सामना शेवटच्या एका मिनिटाजवळ पोहचला. तेव्हा दोन्ही संघांचा स्कोर होता.

क्रिकेटच्या ट्वेंटी ट्वेंटी मॅच मध्ये सुपर ओव्हरला जसा सामना कुठल्याही संघाच्या पारड्यात जाऊ शकतो..तशीच काहीशी किंवा त्याच्यापेक्षा जास्त नाजूक परिस्थिती कबड्डीच्या या फायनल मॅचची होती. कारण मॅच संपायला उरली होती फक्त काही मिनिटं आणि या मिनिटाआधी भारतीय रायडरने मारलेली एक रेड कमालीची चर्चेत आली. त्यानंतर रेडवरुन घमासान झालं.

भारताकडून पवनकुमार सेहरावतने रेड मारली. पवनकुमार इराणी प्लेयर्सला टच करण्यासाठी आतपर्यंत घुसला. बोनस लाईनला टच करायच्या प्रयत्नात तो होताच. इराणी प्लेयर्सही डोळ्यात तोल घालून पवनकुमारच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.

त्याला रोखण्यासाठी त्यांनीही साखळी लावली होती. पण एका क्षणी पवनकुमार इतका आत घुसला. की हीच संधी हेरून इराणी खेळाडूंचा डिफेन्स पवनवर तुटून पडला. पण पवननेही स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न केले.

डिफेन्सच्या जाळ्यातून निसटून जाण्याचा प्रयत्न केला..पवनचा हा प्रयत्न काही अंशी यशस्वी होतोय..हे पाहून ईराणी प्लेयर्स पवनला थेट डॅश करण्याच्या हेतून पुढे आले... पण तोपर्यंत एक इराणी प्लेअर मॅटच्याच बाहेर फेकला गेला होता. पण बाहेर जाऊन तो पुन्हा आत आला.

यानंतर पुढे जे घडलं, त्याने सगळं वातावरण बिघडवलं. पवनला इराणी प्लेयर्स लॉबीच्या बाहेर ढकलण्याच्या प्रयत्न करतात खरे. पण पवनला ढकलण्याच्या नादात तीन इराणी प्लेयर्सही लॉबीच्या बाहेर पडले. त्यामुळे नियमाने भारताला तीन आणि इराणला एक पॉईंट मिळणं अपेक्षित होतं..आणि तसं झालंही.

पंचांनी भारतला एक आणि इराणला तीन पॉईंट दिल्याचा इशाराही केला...पण पंचांचा हा निर्णय इराणी टीम आणि कोचेसला मान्य नव्हता..म्हणून त्यांनी पंचांशी हुज्जत घातली.

प्लेयर्स मैदानात ठाण मांडून बसले..इराणी प्लेयर्स काही केल्या ऐकत नाही...म्हणून पंचांनी आपला निर्णय मागे घेतला...पण हा निर्णय भारताच्या विरोधात जाणारा होता..आणि ज्याच्या विरोधात हा निर्णय जाईल त्याला गोल्ड मेडलपासून वंचित राहावं लागणार होतं..कारण सामन्याचे शेवटचे 60 सेकंद बाकी होते..

पंचांनी आपला निर्णय बदलला म्हणून भारतीय संघानेही मैदानात ठाण मांडलं. संताप व्यक्त केला. आता करावं तरी काय? असा प्रश्न पंच आणि व्यवस्थापनासमोर पडला.... शेवटी डोळ्यात तेल घालून पंचांकडून समान्याचे फुटेज तपासलं गेलं..इराणी प्लेयर्स खरचं लॉबीच्या बाहेर पडलेत का? हे पुन्हा पुन्हा पाहिलं जातं होतं.

पडले तर.. किती प्लेयर्स बाहेर पडले? हे देखील पाहिलं गेलं..आणि गहन चर्चेनंतर तीन पॉइंट्स भारताला आणि एक पॉइंट इराणला देण्यात आला..यामुळे भारतला 33 पॉइंट्स पर्यंत मजल मारता आली..आणि इराणला 29 पॉइंट्स समाधान मानावं लागलं..सहाजिकच गोल्ड मेडल भारताच्या झोळीत पडलं..

Asian Games Kabaddi Controversy:
BAN vs AFG: WC मध्ये विजयाचा नारळ फुटेना! बांगलादेशकडून पराभूत होताच अफगाणिस्तानच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद

एका मिनिटाच्या मॅचची वेळ फक्त बाकी होती.. पण त्यासाठी जवळपास तासभर गदारोळात वाया गेला. एका टीमला समजवल्यानंतर दुसरी टीम भडकायची.. दुसऱ्या टीमची समजूत काढून झाल्यावर पहिली टीम रुसून बसायची.. असा प्रकार सुरु होता...

या एक तासात कितीतरी वेळा भारतीय खेळाडूंच नाही, तर भारतीय कोचही इराणी पंचांना थेट नडले! इराणी खेळाडू निर्णय मान्य नाही म्हणून मैदानावर ठाण मांडून बसले..पंचांना तारेवरची कसरत करावी लागली..दोन्ही संघाचे प्लेयर्स एकमेकांना भिडले..दोन्ही संघांच्या पंचांनीही नियमांचं अक्षरश: पारायण केलं..

या सगळ्या गदारोळानंतर अखेर मॅच सुरु झाली खरी.. आणि भारताने दणदणीत विजयी आघाडी मिळवत गोल्डवर शिक्कामोर्तब केलं. फायनलमध्ये झालेल्या या हायव्हॉल्टेज राड्यामुळे.... एशियन गेम्समधील कब्बडीचा हाच सामना आता अनेकांच्या कायमचा लक्षात राहिल नाही, तरच नवल!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com