Virat Kohli & Sourav Ganguly Saam TV
Sports

विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर सौरव गांगुली म्हणाले हा निर्णय...

सात वर्षे (2014-2022) संघाचे नेतृत्व केल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

वृत्तसंस्था

विराट कोहलीने अचानक कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर क्रिकेट जगतातील सर्वांनाच धक्का बसला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले की, टीम इंडियाच्या (Team India) कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा विराट कोहलीचा निर्णय हा ‘वैयक्तिक’ निर्णय आहे. कोहलीच्या राजीनाम्याने इतरांप्रमाणे गांगुलीलाही धक्का बसला आहे. पण त्याचवेळी बीसीसीआय कोहलीच्या (Virat Kohli) निर्णयाचा आदर करत असल्याचेही गांगुलींनी सांगितले. (Sourav Ganguly Reaction On Virat Kohli)

सात वर्षे (2014-2022) संघाचे नेतृत्व केल्यानंतर विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी कोहलीने वनडे आणि टी-20 च्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली होती. बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ट्विट केले की बोर्ड कोहलीच्या निर्णयाचा आदर करते. गांगुलींनी ट्विट केले की, "विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघातील खेळाडूंनी सर्व फॉरमॅटमध्ये झपाट्याने प्रगती केली आहे. त्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि बीसीसीआय त्याचा खूप आदर करते. तो संघातील महत्त्वाचा सदस्य आहे त्यामुळे आगामी काळात तो संघाला नवीन उंचीवर नेईल."

गेल्या वर्षीच कोहलीने टी-20 कर्णधारपद सोडले आणि त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले. कारण संघ निवडकर्त्यांना वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा होता. गेल्या वर्षी 16 सप्टेंबर रोजी कोहलीने टी-20 फॉर्मेटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर 8 डिसेंबर रोजी निवड समितीने त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरूनही हटवले. कारण निवड समितीला वनडे आणि टी-20 साठी एकच कर्णधार हवा होता. कोहलीला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, त्यानी कोहलीला वनडे कर्णधारपद सोडू नये अशी विनंती केली होती. मात्र कोहलीने याचा साफ इन्कार केला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अॅडवोकेट गुणरत्न सदावर्ते पोलीस उपायुक्त परिमंडळ १ कार्यालयात दाखल

India vs Australia: ऐन रंगात आलेल्या मॅचमध्ये पावसाचा व्यत्यय; वरुणराजाच्या गोंधळानं पहिल्या टी२० सामना रद्द

Shocking: लॉजमध्ये हाई वोल्टेज ड्रामा! नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडलं, बायकोने चपलेनं चोपलं; VIDEO व्हायरल

गर्ल्स हॉस्टेलमध्ये वापरलेल्या कंडोमचा खच; घटनेमागचं सत्य काय? 'हा' व्हिडिओ नेमका कुठला?

kelsi Grammer : प्रसिद्ध अभिनेता वयाच्या ७० व्या वर्षी बनला बाप; बायकोसोबत केलं ८ व्या मुलाचं स्वागत

SCROLL FOR NEXT