kl rahul and sourav ganguly Saam Tv
Sports

Sourav Ganguly On KL Rahul: जर भारतातच धावा केल्या नाहीत तर.. फॉर्मात नसलेल्या राहुलचा गांगुलींनी घेतला क्लास

आता भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील केएल राहुलला खडेबोल सुनावले आहे.

Ankush Dhavre

Indian Cricket Team News: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल गेल्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला आहे. नुकताच सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत देखील त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाहीये.

त्यामुळे त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर अनेक दिग्गजांनी त्याच्यावर टीकेचा वर्षाव केल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

दरम्यान आता भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील केएल राहुलला खडेबोल सुनावले आहे. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दिल्ल्ली कॅपिटल्स संघाचे सराव सत्र सुरु असताना सौरव गांगुली यांनी म्हटले की,' जेव्हा तुम्ही भारतात धावा करण्यात अपयशी ठरता तेव्हा नक्कीच तुमच्यावर टीका केली जाईल. केएल राहुल हा एकमेव खेळाडू नाहीये. तर भविष्यात असे अनेक खेळाडू होऊन गेले, ज्यांना या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे.

केएल राहुल भारतात फ्लॉप ठरत असला तरीदेखील त्याने परदेशात जाऊन धावा केल्या आहेत. याबाबत बोलताना सौरव गांगुली म्हणाले की,' त्याने चांगली कामगीरी केली आहे. मात्र जेव्हा तुम्ही भारतीय संघात टॉप ऑर्डरमध्ये खेळतात, त्यावेळी तुमच्याकडून नेहमीच जास्तीची अपेक्षा असते. कारण कारण इतरांनी ठरवलेले मानक खूप उच्च आहेत.'

तसेच राहुल द्रविड नक्की कुठे चुकतोय? असा प्रश्न विचारला असता सौरव गांगुली यांनी म्हटले की,' जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या खेळपट्टीवर खेळता तेव्हा आणखी कठीण होऊन जातं. कारण चेंडूला टर्नसोबत उसळीही मिळत असते. जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता त्यावेळी असमान उसळी असलेल्या खेळपट्टीवर खेळणं आणखी कठीण होऊन जातं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात रंगली म्हशींची सौंदर्य स्पर्धा

दिवाळीत काळाचा घाला! काँग्रेस नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा जिवंत जळून मृत्यू, फटाक्यांच्या दुकानात भीषण स्फोट

Cham Cham Recipe: सणासुदीला घरच्या घरी बनवा बंगाली मऊ आणि रसाळ चमचम मिठाई; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Politics: पक्ष वाढवणार की संपवणार आहात? शिंदेंनी टोचले पालकमंत्र्यांचे कान, बैठकीत नेमकं काय झालं?

Ramayana Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; ५ दिवसांत ५०० कोटींचा टप्पा पार, 'या' चित्रपटांचा रेकॉर्ड केला ब्रेक

SCROLL FOR NEXT