Sourav Ganguly- Sachin Tendulkar: भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या जोडीने मोलाचं योगदान दिलं आहे. दोघे अनेकदा डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. तसेच अनेक अविस्मरणीय विजय देखील मिळवून दिले आहेत.
दोघांमध्ये असलेली मैत्री ही जगजाहीर आहे. या मैत्रीमुळेच सचिन तेंडुलकरला नियम मोडावा लागला होता. सचिन तेंडुलकरची एक सवय होती, ती सवय म्हणजे दुसऱ्या दिवशी सामना असल्यास सचिन उशिरापर्यंत बाहेर थांबणं टाळायचा.
मात्र श्रीलंका दौऱ्यावर असताना सौरव गांगुलीमुळे सचिनला हा नियम मोडावा लागला होता. नेमकं काय घडलं होतं? वाचा रोमांचक किस्सा.
भारतीय संघ २००८ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर होता. त्यावेळी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होती. या मालिकेत सौरव गांगुली आउट ऑफ फॉर्म होता. त्यामुळे त्याच्यावरील दबाव वाढत चालला होता.
पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मुथय्या मुरलीधरनने २३ तर दुसऱ्या डावात ४ धावांवर बाद केले होते. तर दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात चामिंडा वासने त्याला शून्यावर आणि दुसऱ्या डावात पुन्हा एकदा मुरलीधरनने त्याला १६ धावांवर बाद केलं होतं. या फ्लॉप शोमुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जाऊ लागली होती. (Latest sports updates)
मुरलीधरनने वाढवलं होतं गांगुलीच्या डोक्याचं दुखणं..
सलग २ कसोटी सामन्यांमध्ये फ्लॉप ठरलेला सौरव गांगुली तिसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक करेल असं वाटलं होतं. मात्र या सामन्यातही मुरलीधरन पुन्हा एकदा त्याला नडला होता. मुरलीधरनमुळे सौरव गांगुलीच्या डोक्याचं दुखणं वाढलं होतं.
त्यावेळी सौरव गांगुलीने औषध मागविण्यासाठी सचिन तेंडुलकरला फोन केला होता. सचिनने त्यावेळी त्याला विचारलं होतं की, डोकेदुखीचं कारण काय? त्यावेळी मुरलीधरनच्या फिरकीने डोकेदुखी वाढवली आहे, असं उत्तर सौरव गांगुली यांनी दिलं होतं.
अंतिम सामन्यातील दुसऱ्या डावातही मुरलीधरनने सौरव गांगुलीची विकेट मिळावली होती. म्हणजे ३ सामन्यातील ६ डावांमध्ये मुरलीधरनने ५ वेळेस सौरव गांगुलीला बाद केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.